रब्बी हंगामातील हरभरा पीक आता अंतिम टप्प्यात असून सध्या हरभरा काढण्याचे काम सुरू होत आहे.काही ठिकाणी हरभरा काढणी च्या कामाने वेग घेतला असून बाजारपेठांमध्ये हरभऱ्याची आवक वाढतांना दिसून येत आहे.
परंतु बाजारपेठेचा विचार केला तर हरभऱ्याला 4200 ते चार हजार 700 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळत आहे. या बाजारभावाचा विचार केला तर हा दर म्हणावा तसा दिलासादायक नाही.याच परिस्थितीत नाफेडच्या माध्यमातून सुरू असणार्या खरेदी केंद्रांचा मोठा आधार शेतकऱ्यांना मिळू शकतो.कृषी विभागाने जाहीर केलेल्या द्वितीय आगाऊअंदाजामुळे हरभऱ्याच्या उत्पादनाची चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार प्रत्येक शेतकरी हरभऱ्याची खरेदी शक्य आहे. यावर्षीचा विचार केला तर हरभरा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे हरभरा आवक देखील वाढण्याची शक्यता आहे. जर हरभरा हमीभाव केंद्राचा विचार केला तर या हमीभाव केंद्रांमध्ये पाच हजार 230 रुपये इतका भाव हरभऱ्याला मिळत असूनही केंद्र एक मार्चपासून सुरू झाली आहेत.
त्यामुळे खुल्या बाजारात हरभऱ्याचे आवक वाढून त्याचा परिणाम जर भावावर झाला तर शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रांचा आधार मिळून चांगला दर मिळू शकतो. परंतु यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. यावर्षी हमीभाव केंद्रांच्या माध्यमातून राज्यातून 6 लाख 89 हजार टन हरभऱ्याचे खरेदी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये ही खरेदी केंद्र उभारण्यात आलेली आहेत.
राज्यातील हरभऱ्याची अंदाजित उत्पादकता
परभणी8.20, हिंगोली 11.0, नांदेड 11.50,अकोला 15.00, उस्मानाबाद 6.5, बीड 9.5,औरंगाबाद 5.80, अमरावती 15.60, नागपूर 15.00, नाशिक 9.50,धुळे 10.97, नंदुरबार 13.96, जळगाव 13.00,अहमदनगर7.5, गोंदिया 8.10, सातारा 9.25,सांगली 11.6, कोल्हापूर 12.00,पालघर 7.50,रायगड 4.50, रत्नागिरी 4.90, बीड 9.5,औरंगाबाद 5.80 इत्यादी. (स्त्रोत-हॅलो कृषी)
Share your comments