1. बातम्या

पंतप्रधान मोदींकडून कांद्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न, कांद्याचे दर तेजीतच..

कांदा हा कधी शेतकऱ्यांना रडवतो तर कधी पैसे करून देतो. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. निर्सगाच्या लहरी प्रमाणे कांद्याचे दर हे कमी जास्त होत असतात.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
onion

onion

कांदा हा कधी शेतकऱ्यांना रडवतो तर कधी पैसे करून देतो. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. निर्सगाच्या लहरी प्रमाणे कांद्याचे दर हे कमी जास्त होत असतात. महाराष्ट्रात कांद्याची आवक वाढली आहे, मात्र कांद्याचे दर स्थिर आहेत. कांद्याची आवक वाढूनही दर कमी होत नसल्याने यामध्ये केंद्र सरकारलाच हस्तक्षेप करावा लागला आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील काही बाजार समित्यांना टार्गेट करीत साठवणूकीतला कांदा थेट या बाजार समित्यांना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात राज्यातील लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा आवकही सुरु झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरात सुधारणा झाली असून प्रति क्विंटल सरासरी 3 हजार 500 रुपये दर मिळत आहे. लासलगाव पाठोपाठ सर्वात मोठी असलेल्या बाजारपेठेत कांद्याची आवक सध्या कमी झाली असली तरी दर मात्र टिकूण आहेत. यामुळे केंद्र सरकार हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना हे दर कमी होत नाहीत.

सोलापूरातील मार्केटमध्ये दर टिकूनच नाही तर यामध्ये वाढ होत आहे. क्विंटलपासून 3 हजार 500 पर्यंतचा दर सोलापूर येथील बाजार समितीमध्ये मिळत आहे. कांदा साठवणूकीची क्षमता यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा सडून गेला, तसेच टाकलेले रोप देखील आले नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला. असे असताना काही वाचलेल्या कांद्याला सध्या चांगला भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

असे असताना केंद्रीय स्तरावर मात्र हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, यामुळे शेतकरी केंद्र सरकारवर नाराज आहे. यामुळे येणाऱ्या काळात जर हे दर कमी झाले तर केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे दोन वर्ष शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बाजारभाव नव्हता. यामुळे त्याला मदत करायची सोडून सरकार अन्याय करत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

English Summary: Prime Minister Modi's efforts to reduce onion prices, onion prices continue to rise .. Published on: 22 February 2022, 05:22 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters