1. बातम्या

Pune News : पंतप्रधान मोदी टिळक पुरस्काराने होणार सन्मानित; शरद पवारांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार

नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही याच व्यासपीठावर असणार आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Sharad Pawar&Narendra Modi

Sharad Pawar&Narendra Modi

पुणे 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातील सर परशुराम महाविद्यालय येथे पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

पुण्यातील गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या मेट्रो महामार्गाचे उद्या (१ ऑगस्ट) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. उद्या पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहे. त्यामुळे त्याचवेळी मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 

'एकाच व्यासपीठावर जाण्याआधी एकदा विचार करा'

नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही याच व्यासपीठावर असणार आहेत. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळावं, असं आवाहन विरोधकांकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून मणिपूर घटनेबद्दल आपण सर्वसामान्यांमध्ये जातोय. त्याचा निषेध करतोय.अशी व्यक्ती जी मणिपूरला गेलीच नाहीये. त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणं, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेस तर्फे आवाहन आहे की त्यांनी एकदा तरी याचा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

English Summary: Prime Minister Modi to be honored with Tilak Award The award will be given by Sharad Pawar Published on: 31 July 2023, 04:08 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters