पंतप्रधान मोदींच्या हस्ते मध्यप्रदेशातील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन

Friday, 10 July 2020 04:06 PM


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत मध्य प्रदेशातील रीवामध्ये स्थापन करण्यात आलेल्या ७५० मेगाव्हॅटचा सौरऊर्जा प्रकल्प देशाला समर्पित केला. या क्रार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्रीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असून त्याची क्षमता ७५० मेगाव्हॅट आहे. रीवा जिल्ह्यातील मुख्यालयातून २५ किलोमीटर दूर गुढमध्ये १५९० एकरमध्ये हा प्रकल्प परसरलेला आहे. हा प्रकल्प रीवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड, एमपी ऊर्जा विकास लिमिटेड आणि भारताचे सौरऊर्जा निगम यांचा एक संयुक्त उपक्रम आहे.

सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. आज रीवाने इतिहास रचला आहे. जेव्हा आम्ही आकाशातून टिपलेल्या या प्लांटचा व्हिडीओ पाहतो, त्यावेळी असे वाटते की, हजारो सोलार पॅनल शेतातल्या पिंकाप्रमाणे डोलत आहेत. रीवाचा सौरऊर्जा प्रकल्प या संपूर्ण क्षेत्राला ऊर्जेचे केंद्र बनणार आहे. यामुळे मध्यप्रदेशातील लोकांना लाभ मिळणार असून दिल्लीतील मेट्रोलाही वीज मिळणार असल्याचे मोदी म्हणाले. आता रीवामधील नागरिक गर्वाने सांगतील की, दिल्लीतील मेट्रो आमचा रीवा चालवत आहे. याचा फायदा मध्यप्रदेशातील गरीब, मध्यम वर्गीय, शेतकरी आणि आदिवासी लोकांना होणार आहे.

रीवाची ओळख आई नर्मदेमुळे आणि पांढऱ्या वाघांमुळे आहे. आता रीवाचे नाव आशिया खंडातील सर्वात मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाशी जोडले जाणार आहे.  या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशमधील उद्योगधद्यांसोबतच दिल्लीतील मेट्रोलाही फायदा होणार आहे.

madhya pradesh Prime Minister Prime Minister Modi Prime Minister Modi inaugurates solar power project shivraj singh chauhan मध्य प्रदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सौर ऊर्जा प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प उद्धघाटन
English Summary: Prime Minister Modi inaugurates solar power project in Madhya Pradesh

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.