प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांचा समावेश

Monday, 30 July 2018 05:36 PM
गोसीखुर्द प्रकल्प संग्रहित छायाचित्र

गोसीखुर्द प्रकल्प संग्रहित छायाचित्र

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात सिंचनासाठीच्या मोठ्या आणि मध्यम आकाराच्या ९९ प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे देशातील ७६.०३ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. केंद्र आणि राज्यशासनाच्या भागीदारीतून हे प्रकल्प राबविले जाणार असून नाबार्डच्या माध्यमातून त्यासाठी वित्त पुरवठा करायला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत टप्प्याटप्याने हे प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत.

यात महाराष्ट्रातील वाघूर, बावनथडी, निम्न दुधना, तिल्लारी, निम्न वर्धा, निम्न पानझरा, नंदूर मधमेश्वर-टप्पा २, गोसीखुर्द, अपर पेणगंगा, बेंबळा, तराळी, धोम बालकवाडी, अर्जुना, अपर कुंडलिका, अरुणा, कृष्णा-कोयना, गडनदी, डोंगर गांव, सांगोला, कालवा, खडकपूर्णा, वारणा, मोरणा, निम्न पेढी, वांग प्रकल्प, नरादावे आणि कुडाळी या प्रकल्पांचा समावेश आहे.

English Summary: Prime Minister Agricultural Irrigation Scheme Includes Maharashtra Irrigation Projects

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.