हिरव्या पालेभाज्यांचे दर चांगलेच तेजीत आले आहेत. पितृपक्ष सुरू असल्याने भाजीविक्रेत्यासह ग्राहक बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी करत आहे. भाजीपाल्यांचे दर हे कडाडले असून अनेक भाज्यांनी शंभरी पार केली आहे. पालेभाज्या महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसतोय.
भाज्यांचे दर
पितृपक्षात बाजार समितीतील आवक दरवर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. गवार, दोडके यांनी शंभरी पार केली आहे, टोमॅटो हा चाळीशीपार गेला आहे.
वांगी 60 रुपये किलो, बटाटा, फ्लॉवर, कोंबी 30 रुपये किलो तर भेंडी 80 रुपये किलो दराने मिळत आहे. शेवगा 300 रुपये किलो, दोडका आणि गिलके 100 रुपये किलो, गवार 160 रुपये किलो, श्रावण घेवडा सुद्धा 100 रुपये किलोवर जाऊन पोहचला आहे.
पितृ पक्षा दरम्यान कावळ्यांना अन्न का दिले जाते? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि कथा
मागणी वाढल्याने पुरवठ्यात घट झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय पावसाने नुकसान झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
शेवग्याला मिळतोय तब्बल 16 हजार रुपयांचा भाव; जाणून घ्या इतर पालेभाज्यांचे बाजारभाव
पितृपक्षात भाजीपाला हा जास्तच दराने ग्राहकांना खरेदी करावा लागतो, मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पितृपक्षात बाजार समितीतील आवक दरवर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे.
त्यामुळे पालेभाज्यांचे दर आणखी तेजीत राहणार असून महिना ते दीड महिना ही परिस्थिति अशीच राहील असा अंदाज बाजार समितीकडून वर्तविला जात आहे.
Share your comments