निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे मात्र बाजारात दर स्थित असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. परंतु केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नेहमी अडचणी राहिलेल्या आहेत. अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण असल्याने केळीच्या बागेवर किडींचा प्रादुर्भाव तर झालाच आहे पण त्यासोबतच थंडीमध्ये वाढ झाल्याने मागील १५ दिवसात बाजारामध्ये केळीला चार ते पाच हजार प्रति क्विंटल असा दर मिळाला. पण आता मात्र चित्र बदलले आहे जे की थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्यात महाशिवरात्री जवळ आली असल्याने व्यापाऱ्यांची केळी ला जास्त मागणी आहे. राज्यातील विविध बाजारपेठेत केळीचे प्रति टन दर १५ ते १६ हजार रुपयांवर पोहचले आहेत.
व्यापाऱ्यांकडून साठवणूकीला प्राधान्य :-
आता कुठे केळी ला पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे केळीमध्ये वाढ होत आहे नाहीतर सारखी कोणती न कोणती संकटे केळी उत्पादकांवर येतच असायची. मागील आठ दिवसांपासून केळी चे चित्रच बदलले आहे. तसेच महाशिवरात्री सुद्धा जवळ आली असल्याने केळीला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी आहे शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे केळीच्या उत्पादनात घट निर्माण झाली असल्यामुळे केळी च्या दरात भलतीच वाढ झाली आहे. आतापर्यंत व्यापारी केळी खरेदी करण्यास पाठ दाखवत होते पण आता महाशिवरात्री जवळ आल्याने व्यापारी वर्ग केळी चा साठा करत आहेत.
बागेवर कोयता चालवून शेतकऱ्यांना होतोय पश्चाताप :-
मागील काही दिवसांपूर्वी केळीचे दर पूर्णपणे घसरले होते तसेच वाढत्या थंडीचा प्रादुर्भाव असल्याने नागरिक सुद्धा केळीकडे पाठ फिरवत होते. ओमीक्रोन चा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे वाढीव दर सोडाच शेतकऱ्यांना तोडणी सुद्धा परवडत नसल्यामुळे स्वतः केळी उत्पादकांनी केळी च्या बागेवर कोयता चालवला होता आणि त्यानंतर लगेच १५ दिवसांनी केळी ला चांगला दर मिळू लागला. ज्या ज्या शेतकऱ्यांनी रागाच्या भरात बागेवर कोयता चालवला त्या शेतकऱ्यांना पश्चाताप होत आहे.
आता मोजक्याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ :-
निसर्गाच्या लहरीपणामुळे केळीवर किडीचा प्रादुर्भाव झाला तसेच दर घसरले असल्याने शेतकऱ्यांनी थेट बागा न बागा उध्वस्त केल्या. मात्र आता मागील दीड वर्षात कधी एवढा दर मिळाला नाही तेवढा आता केळी ला दर मिळत आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी केळीच्या बागेची काळजी घेतली त्यांना आता वाढीव दराचा फायदा भेटत आहे. महाशिवरात्री जवळ आली असल्याने अजून वाढीव दर केळी ला भेटणार आहेत.
Share your comments