खरीप हंगामात अवकाळी पाऊस जणू काही काळ बनून बरसत होता. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामात आलेल्या अवकाळी नामक संकटामुळे सर्वात जास्त क्षती डाळवर्गीय पिकांचे झाली. डाळवर्गीय पीकापैकी एक असलेले तूर डाळ पिकाला देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला त्यामुळे तुरीच्या उत्पादनात विक्रमी घट नमूद करण्यात आली आहे. बाजारपेठेच्या गणितानुसार, ज्या शेतमालाची उत्पादनात घट होते त्याला चांगला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असतो तुरीच्या पिकाबाबत देखील अशीच परिस्थिती राहणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.
उत्पादनात घट झाल्यामुळे तुरीच्या बाजार भावात कधी नव्हे ती विक्रमी वाढ होण्याचे सांगितले जात आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबियाच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम घडून येणार असून खिशाला मोठी कात्री बसण्याचा धक्का बसणार आहे. सध्या देशांतर्गत सर्व डाळींच्या बाजार भावात चढ-उतार कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीमुळे तुरीचे उत्पादन लक्षणीय कमी झाले आहे. त्यामुळे यंदा तुरदाळ तब्बल सव्वाशे रुपये प्रति किलो दराने विकले जाणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. शेतकरी मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम हा इतर हंगामापेक्षा महत्त्वाचा असतो आणि याच हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. खरीप हंगामात मुख्य पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन कापूस कांदा समवेतच डाळवर्गीय पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
सोयाबीन आणि कापूस पिकात झालेल्या घटामुळे संपूर्ण हंगाम भर कापुस दहा हजाराच्या घरात तर सोयाबीनला देखील समाधानकारक बाजार भाव प्राप्त झाला आहे. तूर पिकाच्या बाबतीत देखील सोयाबीन आणि कापसा सारखीच परिस्थिती राहणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांद्वारे कथन केले जात आहे. तुर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मते, यावर्षी तुरीला विक्रमी बाजार भाव मिळेल, तुरीला जवळपास सव्वाशे रुपये प्रतिकिलो पर्यंतचा दर मिळण्याची आशा वर्तवण्यात आली आहे.
मात्र असे असले तरी तुरीला भविष्यात जर चांगले दर प्राप्त झाले तर शेतकऱ्यांचा यामुळे थोड्याफार प्रमाणात फायदा होईल कारण की उत्पादनात घट झाली असल्याने बाजार भाव जरी चांगला प्राप्त झाला तरी शेतकऱ्यांकडे तूर कमी शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना एवढा फायदा मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला झळ बसणार एवढे नक्की. आगामी काही दिवसात मध्यमवर्गीयांच्या खिशाला ताण पडणार असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.
Share your comments