वादळी वाऱ्यासह विदर्भ अन् मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता

16 March 2020 10:03 AM


विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोरड्या हवामानामुळे कमाल  तापमानात वाढ होऊ लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटे गारठा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असून धुळे, निफाड येथील तापमान १० अंशाखाली घसरले आहे.

राज्यातील काही भागात दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. राज्यातील तापमानात तफावत जाणवत आहे. दिवसा उकाडा जाणवतो तर रात्री गारवा जाणवतो.  राज्यात पुर्वमोसमी पाऊस हंगामाला सुरुवात झाली आहे. विदर्भात दुपानंतर वातावरण ढगाळ हवामान झाले होते. मराठवाड्यातील नांदेड व लगतच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह गारपीठ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसापूर्वी देशाच्या राजधानीही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. 
 

Vidarbha Region marathawada rain fall विदर्भ मराठवाडा पाऊस हवामान विभाग IMD
English Summary: predication of rainfall in vidarbha and marathwada

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.