अलीकडे शेती करणे काही सोपे राहिलेले नाही, शेतीमध्ये दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढत आहे. याचाच प्रत्यय आता पुणे जिल्ह्यातून समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात नव्हे-नव्हे तर संपूर्ण राज्यात सध्या शेतीचे मशागतीचे कार्य प्रगतीपथावर आहे. नांगरणी, तिरी, कोळपनी, पाळी देणे इत्यादी शेती मशागतीचे कार्य जोरात सुरु आहे. राज्यात सर्वत्र शेतकरी बांधव यासाठी लगबग करताना बघायला मिळत आहे.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून इंधनाच्या दरात होत असलेली भरमसाठ वाढ यामुळे शेतीची पूर्वमशागत आता महागले असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पूर्व मशागतीच्या खर्चात होणारी भरमसाठ वाढ शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसवत असल्याने शेतकरी मोठे संताप व्यक्त करीत आहेत. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात मोठे नुकसान झाले आहे, आणि आता येणाऱ्या खरिपात देखील यामुळे मोठे नुकसान होऊ शकते म्हणून दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती पुणे जिल्ह्यात नव्हे नव्हे तर संपुर्ण राज्यात बघायला मिळत आहे.
राज्यात सर्वत्र डिझेलचे दर शंभर रुपयांच्या घरात गेले आहेत आणि यामुळेच शेतीची पूर्वमशागत महागली असल्याचे सांगितले जात आहे. पुणे जिल्ह्यात सध्या शेतीची पुर्व मशागतीचे कामे करण्यासाठी ट्रॅक्टरला एकरी पंधराशे ते अठराशे रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांद्वारे सांगितले जात आहे. शेतीच्या पूर्वमशागत व्यतिरिक्त डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतमालाची वाहतूकही महागली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना दुहेरी फटका बसत आहे. अंबड तालुक्यात कापसाची वेचणी पूर्ण झाली असून तुरीची देखील काढणी आणि मळणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधव शेतीची पूर्व मशागत करण्यात व्यस्त आहेत. उन्हाळ्यात शेताची नांगरणी झाल्यास मृगनक्षत्र पर्यंत शेत चांगले उन्हात तळले जाते यामुळे जमिनीत असलेले विषाणू मरून जातात तसेच पावसाचे पाणी सरळ जमिनीत मुरते. मागील वर्षी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना 1300 एकरी खर्च येत होता, सध्या हाच खर्च पंधराशे रुपये एवढा झाला आहे.
एकंदरीत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणारा शेतकरी डिझेल दरवाढीमुळे हतबल झाला आहे. सुलतानी दडपशाही आणि अस्मानी संकट या दुहेरी कात्रीत शेतकरी राजा पूरता भरडला जात आहे. नांगरणीसाठी ऊसाचे वावर असल्यास 2500 रुपये एकरी खर्च लागत आहे. इतर पिकांचे वावर असल्यास शेतकऱ्यांना एकरी 1500 ते 1800 रुपये खर्च येत असल्याचे सांगितले जातं आहे. एकंदरीत डिझेलचे दर वाढल्याने मशागत खर्च वाढला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भर पडणार आहे.
Share your comments