1. बातम्या

जळगाव जिल्ह्यातील साडेसहा हजार थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत

जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. मागील काही दिवसांपासून थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान संबंधित कारवाई टाळण्यासाठी शासनाने कृषी पंप धारक थकबाकी असल्यास शेतकऱ्यांना 50 टक्के सवलत वीज बिलात दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत

जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ साडेसहा हजार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.  मागील काही दिवसांपासून थकबाकीदार शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

कोरोनामुळे महावितरण तर्फे सर्व प्रकारच्या ग्राहकांचे प्रत्यक्षात रीडिंग न घेता त्यांना सरासरी प्रमाणे बिल देण्यात आले. मात्र देण्यात आलेली वीजबिल अवाजवी असल्याच्या तक्रारी करत ग्राहकांनी वीज बिल भरण्याकडे पाठ फिरवली. संबंधित येणाऱ्या तक्रारी निवारणासाठी महावितरणने जिल्ह्याभरात तक्रार निवारण शिबिरे घेतली.यामध्ये ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून विज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले.

 

तरीदेखील ग्राहकांकडून विज बिल भरण्यासाठी प्रतिसाद न आल्याने साडेतेरा शेकोटीच्या घरात थकबाकी जमा झाली आहे. महावितरण तर्फे मागच्या वर्षीच्या मार्च पासून वीजबिल न भरलेल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगा रण्यात आला आहे.

 

त्यामध्ये कृषी पंप धारक शेतकरी बांधवांचा समावेश आहे. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसात जळगाव जिल्ह्यातील सहा हजार 491 शेतकरी बांधवांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

English Summary: Power supply to six and a half thousand arrears farmers in Jalgaon district Published on: 03 April 2021, 09:50 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters