राज्यात ऊसाला आग लागण्याच्या घटनांना काही सीमा उरली नसून महावितरण कंपनीच्या तारा गेलेल्या परिसरात ऊस उत्पादन घेणे म्हणजे मोठे जिकिरीचे झाले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओतूर डुंबरेमळा येथे हाय टेन्शन विद्युत वाहक तारांचे घर्षणाने आगीच्या ठिणग्या उडून ऊसाच्या शेताला आग लागली. या आगीत सहा एकरातील ऊस जाळून खाक झाला.
वर्षभर काबाडकष्टासह रात्रंदिवस पाणी देऊन मुलाप्रमाणे वाढवलेल्या ऊसाची डोळ्या देखत राख झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले. तर या घटनेने मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ओतूर डुंबरेमळा येथील कांडाची आई माता मंदिर परीसरात प्रशांत सखाराम डुंबरे, सखाराम मारूती डुंबरे, अनिल दामोदर डुंबरे, देवेंद्र जयराम घुले या ४ शेतकऱ्यांचा ६ एकरातील ऊस जळाला.
तर या दुर्घटनेने ३० ते ४० टक्के ऊसाच्या उत्पादनात घट होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यापूर्वी देखील याच परिसरात भगवान विष्णू घुले यांच्या तीन एकर ऊसाला विज वाहक तारांच्या घर्षणामुळे आग लागून नुकसान झाले असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगीतले. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून परिसरात असलेल्या विज वाहक तारांची आणि येथील विद्युत बॉक्सची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
जेणेकरून परिसरातील आणखी पिकांची राखरांगोळी होऊ नये अशी संतप्त भावना देखील शेतकऱ्यांनी या दरम्यान व्यक्त केली. तर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून तातडीने ऊस तोडणी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत असल्याने आता भरपाईची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
भारत भागवतोय ५८ देशांची भूक, भारतातून ५८ देशांमध्ये गव्हाची निर्यात, युद्धामुळे बाजारभावावर परिणाम, वाचा नवे दर..
गरीब शेतकरी वीजबिल भरत आहेत, राजकीय वरदहस्त असलेल्यांची वीजबिल भरलेच नाही, वाचा धक्कादायक आकडेवारी
आता पावसाळ्याच्या तोंडावरच बंद होणार साखर कारखाने, अतिरिक्त उसावर साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय...
Share your comments