नाबार्डच्या NLM योजनेअंतर्गत कुक्कुटपालन (Poultryfarm) उद्योगासाठी सबसिडीची योजना

28 November 2020 03:56 PM By: KJ Maharashtra

कर्ज घेण्याविषयी माहिती:

पोल्ट्री फार्म उद्योगाला वाढविण्यासाठी सरकार कर्ज देते आणि कर्जासोबत सब्सिडी देते. कुक्कुटपालनासाठी सरकार 25% ते 33% पर्यंत सब्सिडी देतात. एससी/एसटी वर्गाच्या लोकांना ही सब्सिडी 35% पर्यंत मिळते. नाबार्ड कुक्कुटपालनावर ही सब्सिडी देते. कुक्कुटपालनासाठी कोणतीही व्यक्ती कर्ज घेऊ शकते. पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंड (PVCF) योजना देशात पोल्ट्री फार्म व्यवसाय आणि नाबार्ड बैंक आणि एमएसएमई निधी व्यवसायाचा उद्देश सुरूवातीला प्रचार करणे हाच हेतु या योजनेचा आहे. भारताची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी पोल्ट्री व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करणे व देशाची अर्थव्यवस्था सुधारणे त्याचबरोबर शेतक-यांना आत्मनिर्भर करणे.

कर्ज कसे घ्यावे:

1) कुक्कुटपालनासाठी आपण कोणत्याही सरकारी बैंकेतुन कर्ज घेऊ शकतात.

2) State Bank of India या कामासाठी एकुण 75 टक्के पर्यंत कर्ज देते आणि 5000 कोबंड्याच्या पोल्ट्री फार्मसाठी 3,00,000 रूपये पर्यंत कर्ज एसबीआई देते. एसबीआई बैंकेने कुक्कुटपालनासाठी कर्ज देणा-या योजनेला 'ब्रोयलर प्लस योजना' हे नाव दिले आहे. येथे आपण 9 लाख रूपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात.

कर्जासाठी आवश्यक लागणारे कागतणत्रे.

1) ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, मतदान कार्ड व पासपोर्ट याची गरज आहे.

2) दोन पासपोर्ट साइज फोटो.

3) जिवंत असल्याचा पुरावा: रेशन कार्ड, लाइट बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, मुळ निवासस्थानी प्रमाणपत्र आवश्यक आहेत.

4) पोल्ट्रीचे प्रकल्प रिपोर्ट

हेही वाचा :महाराष्ट्रात सुरू होईल महा पशुधन संजिवणी योजना


नियम व अटी:

पोल्ट्री व्यवसायासाठी आपण तयार केलेली जमीन किमान 5000 कोंबड्याची असली पाहिजे. व जास्तीत जास्त क्षमता कितीही असु शकते.  SBI चे कर्ज 5 वर्षात परतफेड करायचे असते. जर काही कारणाने आपण 5 वर्षात कर्ज परतफेड करू शकले नाही तर आपल्याला 6 महिन्याचा मुदत दिली जाते. या प्रकारेच इतर बँकेतही अर्ज करता येऊ शकतो.

कर्जासाठी आपला प्रोजेक्ट रिपोर्ट व प्रेझेन्टेशन महत्वाचे आहे. बँक कर्ज देण्यास तयार झाली तर लवकरच आपण स्वता:चा पोल्ट्री व्यवसाय सुरू करू शकता.

NABARD poultry loan
English Summary: Poultry form subsidiary under the NLM

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.