सध्या सर्व राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हवामान विभागानुसार आगामी काही दिवसात राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. यामुळे तूर्तास तरी राज्यातील जनतेला उकाड्यापासून आराम मिळणार नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना तसेच शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा फटका बसत आहे. गत दोन वर्षे कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसाय पुरता डबघाईला गेला होता.
यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा बघायला मिळाला नाही यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना चांगली कमाई होणार अशी आशा होती. मात्र यावर्षी पोल्ट्री व्यवसायिक एका वेगळ्याच कारणामुळे संकटात आले आहेत. सध्या वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. उन्हात दिवसेंदिवस वाढ होतं असल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार एकट्या अहमदनगर जिल्ह्यात दिवसाला जवळपास 50 कोंबड्याचा मृत्यू होतं आहे.
यामुळे पोल्ट्री व्यवसायिक संकटात सापडले आहेत. जाणकार लोकांच्या मते, उन्हाळ्यात अशी परिस्थिती काही पहिल्यांदाच आली आहे असे नाही याआधी देखील अशी परिस्थिती बघायला मिळाली आहे. मात्र यावर्षी मृत्युंचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असल्याने ही एक चिंतेची बाब बनली आहे.
एकीकडे वाढत्या उन्हामुळे संपूर्ण राज्यात फळबाग लागवड प्रभावित झाली आहे तर अखेरच्या टप्प्यात असलेली उन्हाळी पिके देखील होरपळून जातं आहेत. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे प्रमुख शेतीपूरक व्यवसाय म्हणुन ओळखला जाणारा पोल्ट्री व्यवसाय देखील संकटात सापडला आहे. यामुळे हा उन्हाळा शेतकऱ्यांना अधिक त्रास देत असल्याचे सांगितलं जातं आहे.
महत्वाच्या बातम्या:
याला म्हणतात सक्सेस! रिटायर्ड ऑफिसरने सुरु केला शेळीपालन व्यवसाय; आज वार्षिक एक कोटींची उलाढाल
कामाची बातमी! मोदी सरकारच्या 'या' योजनेमार्फत सर्व्यांना मिळणार वार्षिक 36 हजार; वाचा या विषयी
पोल्ट्री व्यावसायिकांनी केल्या विविध योजना
अहमदनगर जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्यांची मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र साऱ्या उपाययोजना या वेळी फेल होताना दिसत आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्म वर उन्हापासून बचाव करण्यासाठी गवताचे थर अथरले आहेत. याशिवाय फॉगर्सची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. काहींनी पोल्ट्री फार्मचे छत पांढऱ्या कलरने रंगवले आहेत.
मात्र या सर्व उपाययोजना निरर्थक सिद्ध होत असून मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी उन्हाळी हंगामात पंधरा ते वीस कोंबड्या दिवसाला मरत होत्या मात्र अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी दिवसाकाठी 50 कोंबड्या मृत्यू पावत असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांना मोठा फटका बसत आहे.
यामुळे होत असलेले नुकसान कसे भरून काढणार हा मोठा प्रश्न पोल्ट्री व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. अहमदनगर जिल्ह्यात 5000 प्लस पोल्ट्री फार्म आहेत. यात 30 लाख अंडी देणारे पक्षी असून 11 लाख पक्षी मांसासाठी पाळले जात आहेत. दरवर्षी 6 टक्के पक्षी मृत्यू पावत असतात मात्र या वर्षी तब्बल 12% पक्षी मृत्यू पावत असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांची पायाखालची जमीन सरकू लागली आहे. एकंदरीत वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका बसत असून केलेल्या सर्व उपाययोजना आता फेल होत आहेत.
Share your comments