कोरोना व्हायरसमुळे पोल्ट्री उद्योगाला फटका

07 March 2020 02:45 PM


मुंबई: 
जगात कोरोना व्हायरसने हाहाकार घातला असून भारतातही काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून योग्य काळजी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसविषयी विविध पद्धतीने जनजागृती केली जात आहे. हा विषाणू कशामुळे पसरतो किंवा कशामुळे होत नाही याची माहिती सरकार सर्व समाज माध्यमातून देत आहे. विशेष प्रत्येक राज्य आपल्या क्षमतेनुसार या संकटाला टक्कर देत आहे. परंतु या विषाणूच्या प्रसाराबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. या अफवांचा परिणाम हा राज्यातील पोल्ट्री उद्योगवर झाला आहे.

चिकन खाल्याने हा आजार पसरतो अशा बातम्या सोशल मीडियावर पसरल्याने चिकन अंत्यत कमी दरात विकले जात आहे. महाराष्ट्रासह भारतातील पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे.चिकन विक्रीत घट झाल्याने सुमारे १३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याविषयीची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाचे १०० ते १२० कोटींचे नुकसान झाले आहे. राज्यात ब्रॉयलर चिकनची मागणी दिवसाला २ हजार ८०० टन एवढी आहे. मात्र अपवा पसरल्याने चिकनच्या मागणी घट झाली असून काही ठिकाणी चिकन ४० ते ५० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने परिपत्रक काढून अफवांचे खंडन केले आहे.  

खरंच ब्रॉयलर कोंबड्यांमध्ये कोरोना विषाणू आहेत का

कोरोना व्हायरसविषयी अनेक अफवा पसरल्या आहेत. ब्रॉयलर कोंबड्यांमध्येही या विषाणू आहेत. चिकन खाऊ नये, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावर पसरत होत आहेत. हे संदेश जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय वैद्यकिय असोसिएशनच्या नावाने पसरले जात आहेत. परंतु हे मेसेज पुर्णत: खोटे आहेत. अशा अफवांची सत्यता पडताळणीसाठी आमच्या कृषी जागरणच्या फॅक्ट चेकर्सच्या टीमने याचा मागोवा घेतला. सत्यता पडताळून पाहिल्यानंतर ब्रॉयलर किंवा इतर कोंबड्यांमध्ये व्हायरस नसल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे चिकन खाण्यासाठी योग्य आहे. फक्त मांसाहार करताना मांस चांगले शिजवून खावे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटना आणि भारतीय वैद्यकिय असोसिएशननेही चिकन आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितले आहे. 

कोरोना व्हायरस पोल्ट्री ब्रॉयलर कोंबडी Coronavirus poultry boiler broiler chicken चिकन
English Summary: poultry business loss due to corona virus

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.