यावर्षी आपण पाहिले की खरीप हंगाम हा पूर्णपणे वाया गेलेला आहे. झालेल्या पावसाने संपूर्ण शेतमाल पिकांचे अगणित नुकसान केले. याचा फटका हा डाळवर्गीय पिकांना देखील मोठ्या प्रमाणात बसला. परंतु या नुकसानीचा हातात थेट परिणाम ग्राहकांच्या खिशाला बसण्याची दाट शक्यता आहे
डाळवर्गीय पिकांच्या मध्ये जर तूर पिकाचा विचार केला तर तुर पिकाला देखील काढणीच्या वेळेस या बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तसेच मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे त्यामुळे तूळ डाळीचे दरशंभरी पार करून जाण्याचे संकेत मिळत आहेत.
अवकाळी पाऊस या मागील प्रमुख कारण….
बदलता वातावरण तसेच येत असलेला अधून-मधून चा अवकाळी पाऊस यामुळे तुरीच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
नवीन डाळ येण्यास अजूनही दोन महिन्याचा कालावधी बाकी असून जुन्या डाळीची मागणी कमी झाली असल्याने सध्या तूर डाळ 88 ते 92 रुपये प्रति किलो आहे.तसेचअमरावती, वाशिम आणि अकोला येथील डाळ मिलमध्ये तुरीची आवकहोण्यासाठी अजून पंधरा दिवस कालावधी लागण्याची शक्यता आहे.मार्च महिन्या नंतर मात्र डाळीचे दरवाढीचे संकेत मिळत आहेत.सर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर झालेल्या पावसामुळे 4750 हेक्टर रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
इतर राज्यांची परिस्थिती
- राजस्थान मध्ये आलेल्या पावसामुळे जवळजवळ 70 हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. छत्तीसगड राज्यांमध्ये देखील 37 हजार बावीस हेक्टर पिकांचे नुकसान झाले. कर्नाटक मध्ये आलेल्या पावसाने तुरीच्या पिकाची गुणवत्ता घसरली आहे. अद्यापही कर्नाटक राज्यांमधून तुरीची आवक सुरू न झाल्याने येत्या काही दिवसात भाव वाढण्याचे संकेत दिले आहेत.(स्त्रोत-हॅलोकृषी)
Share your comments