1. बातम्या

मध्य महाराष्ट्र, मराठावाड्यात वादळी पावसाची शक्यता


कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यातही जोरदार, तर विदर्भात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. आज पण कोकणात पावसाचा जोर कायम आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुजरातलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून गेले आहे. तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे.

गोव्यापासून कर्नाटकपर्यंत किनारपट्टीली समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर देशाच्या राजधानी दिल्लीत पुढील दोन तासात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यादरम्यान वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, दिल्ली -एनसीआरसह पानीपत, करनाल, कैथल, कुरुक्षेत्र, जींद, गोहाना, गन्नौर, बडौत, सोनीपत, शामली, मुझफ्फरनगर, मेरठ, मोदीनगर, बिजनौर, गुरुग्राम, रेवाडी, नुंह, पलवल, फरीदाबाद, बुलंदशहर, आणि हाजीपूर या जिल्ह्यात पुढील दोन तासात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. यादरम्यान प्रति तास २० ते ४० किमीच्या वेगाने वारे वाहणार आहे.

कोकणातील सर्वच जिल्ह्यासह घाटमाथा, धऱणांच्या पाणलोट तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी, बीड, जालना, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात वादळी मेघगर्जनेसह, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters