महाराष्ट्रामध्ये डाळिंब लागवड फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यात डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे.आधीच महाराष्ट्रातील डाळिंबाचे उत्पादन हे घटले असताना त्यातल्या त्यात गुजरात आणि राजस्थान मधून डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे
त्यामुळे स्थानिक उत्पादकांना डाळिंब दरामध्ये मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जर देशाचा विचार केला तर 80 हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहार धरला जातो. या भागातील 70 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे.
यावर्षी सुरुवातीला डाळिंबाला 30 ते 40 रुपये किलो असा दर मिळाला होता परंतु कालांतराने गुजरात आणि राजस्थान मधून डाळिंबाची बाजारपेठेत आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.
सध्या डाळिंबाला प्रति किलो 60 ते 100 रुपये असा दर मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या काही वर्षांपासून डाळिंब लागवड क्षेत्रात वाढ झाल्यामुळे त्यातच या भागात कमीत कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा फायदा डाळिंब पिकाला झाला आहे.
त्यामुळे तेथील पीक देखील चांगले राहिले आहे. या दोन्ही राज्यातील डाळिंबाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे तेथील डाळिंब महाराष्ट्राचा अन्य राज्यातील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली आहेत. या वाढलेल्या डाळिंब च्या आवकेमुळे स्थानिक डाळिंब दरावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
Share your comments