बाजारपेठेतील एकमेव सूत्र म्हणजे उत्पादनात घट तर दरामध्ये वाढ. परंतु डाळिंब पिकाच्या बाबतीत उलटेच घडलेले आहे. जे की यंदाच्या वर्षी राज्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि सतत बदलल होणाऱ्या वातावरणामुळे राज्यातील डाळिंबाच्या उत्पादनात निम्यापेक्षा जास्तच घट झालेली आहे. शेतकऱ्यांना असे वाटत होते की उत्पादनात घट झाली असल्याने दरात वाढ होईल मात्र बाजारपेठेत दरात घसरण च होत चालली आहे. राज्यातील डाळिंबाचे उत्पादन जरी घटले असले तर गुजरात आणि राजस्थान राज्यातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे.
मृग बहर अधिकचा असूनही उत्पादनात घटच
देशात सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली जाते त्यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश इ. सर्व राज्यांचा समावेश होतो. पूर्ण देशात ८० हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहर धरला जातो त्यामध्ये एकट्या महाराष्ट्र राज्याचा ७० टक्के वाटा आहे. कर्नाटकात फारसा पाऊस पडला नसल्याने तेथील डाळिंबावर जास्त परिणाम झाला नाही मात्र महाराष्ट्र राज्यातील डाळिंबावर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जे की हे नुकसान पाहूनच दुसऱ्या राज्यातील डाळिंबाची आवक वाढली.
असा राहिला आहे डाळिंबाचा दर
डाळिंब हंगामाच्या सुरुवातीला यंदा १३० ते १३५ रुपये बाजारपेठेत दर होता मात्र मध्यंतरी झालेल्या नुकसानीमुळे दरात अजून १५ ते २० रुपयांनी वाढ झालेली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली त्यामुळे अधिकचा दर भेटेल अशी शेतकऱ्यांना अशा होती मात्र ऐन वेळी परराज्यातील डाळिंबाची आवक वाढल्याने दरात घट झाली. सध्या डाळिंबाचे दर ८० ते १०० रुपये किलो आहेत त्यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादकांना दोन्ही बाजूने फटका बसलेला आहे.
निर्यातीवरही परिणाम
दरवर्षी डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असते. दरवर्षी युरोप ला डाळिंबाची निर्यात देशातून २ हजार टन केली जाते मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्याने फक्त ३०० टन डाळिंबाची निर्यात झालेली आहे. राज्यात अतिवृष्टी, तेलकट आणि पिन बोअर होल या तिन्ही गोष्टींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना तिन्ही संकटांना तोंड द्यावे लागले आहे.
Share your comments