1. बातम्या

डाळिंब उत्पादन घटले, निर्यातीवर परिणाम

भारतातून इतर देशात होणाऱ्या डाळिंब निर्यातीमध्ये घट झाली आहे, कारण मागील दोन वर्षापसून डाळिंब उत्पादक जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच हवामानातील बदल यामुळे डाळींब बागांवर रोगराई चे प्रमाण वाढले असून औषधाचे भाव खूप वाढले आहेत, त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे.

Pomegranate production declined

Pomegranate production declined

भारतातून इतर देशात होणाऱ्या डाळिंब निर्यातीमध्ये घट झाली आहे, कारण मागील दोन वर्षापसून डाळिंब उत्पादक जिल्ह्यात अवकाळी पाऊस तसेच हवामानातील बदल यामुळे डाळींब बागांवर रोगराई चे प्रमाण वाढले असून औषधाचे भाव खूप वाढले आहेत, त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे.

भारतातून २०२०-२१ मध्ये ७० हजार टनापेक्षा जास्त डाळींब निर्यात झाली झाली होती. तर सध्या २१-२२ मध्ये अंदाजित ५० हजार टन निर्यात निर्यात असेल. डाळिंब निर्यातीत महाराष्ट्राचा १०० टक्के वाट असायचा.  परंतु सध्या गुजरात राज्यातूनही निर्यात चालू झाली आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात डाळिंब निर्यात केली जाते. परंतु या भागात सध्या पावसाचे प्रमाण वाढले असुन यामुळे डाळिंब बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

अनेक ठिकाणी हजारो हेक्टर वरील डाळिंब बागा खोडकिडीमुळे नष्ट झाल्या असून त्या भागातून निर्यात पूर्णतः बंद झाली आहे. डाळिंब उत्पादकांच्या मते यावेळी निर्यातीमध्ये गुजरातचा वाटा २० टक्के राहील.

राज्यातील एक लाख त्रेचाळीस हेक्टर वर डाळिंब बाग असून यामधील पन्नास टक्के बागा खोडकिडीमुळे तसेच इतर रोगांमुळे काढून टाकण्यात आल्या असून, शेतकरी नव्याने बागा लावण्यास उत्सुक नाहीत त्यामुळे डाळिंब क्षेत्रात पुन्हा लवकर वाढ होण्याची शक्यता कमी आहे.

महत्वाच्या बातम्या
थेंबे थेंबे तळे साचे'उक्तीप्रमाणे बचत आहे महत्त्वाची! म्हणून पोस्टाची ही योजना ठरेल तुमच्यासाठी फायद्याची
Minister Dada Bhuse : कृषिमंत्री दादाजी भुसे यांची कौतुकास्पद 'दादागिरी'!! दादांनी जुगार अड्डा केला उध्वस्त…..

English Summary: Pomegranate production declined, affecting exports Published on: 26 April 2022, 09:52 IST

Like this article?

Hey! I am शैलेश म्हातारदेव डमाळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters