गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक शेतकरी दुष्काळामुळे शेती करण्यास असमर्थ बनले आहेत. शेती असूनही दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने सरकार दरबारी अनेक योजना राबविल्या जात आहेत. यापैकीच एक प्रमुख योजना आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, या योजनेस पोखरा म्हणून संबोधले जाते. 2017-18 ते 2023-24 पर्यंत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राज्यात अनेक जिल्ह्यात राबविली जाणार आहे.
या योजनेची महती मायबाप सरकार ढोल-ताशे वाजवून साऱ्या जगाला सांगत फिरत आहे. परंतु या योजनेच्या साइटवर अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 'आधार नॉट लींकिंग' सारख्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे योजनेअंतर्गत अनुदानासाठी पात्र असून देखील शेतकऱ्यांना अनुदान जमा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत एवढेच नाही तर पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी इतरत्र सर्व ठिकाणी आधार चा उपयोग करून बँकेचे व्यवहार करत आहेत मात्र पोखरा च्या साइटवर आधार लिंकिंग नाही म्हणून शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत, अनेक शेतकऱ्यांना आधार लिंकिंगच्या या अधिकृत साइटवर येत असलेल्या प्रॉब्लेम मुळे आपण अनुदानापासून वंचित तर राहणार नाही ना? असा प्रश्न आता भेडसावू लागला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने या गोष्टीवर जातीने लक्ष घालून अधिकृत साइटवर येत असलेली त्रुटी लवकरात लवकर दूर करून पात्र शेतकऱ्यांना अनुदान देऊ करावे अशी मागणी आता शेतकरी बांधव करत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी अनुदान आरटीजीएस च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करावे अशी देखील मागणी केली आहे.
राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे विकासाला गती मिळावी तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत मिळावी या उदात्त हेतूने 2017-18 या आर्थिक वर्षात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोखरा राज्यातील अनेक जिल्ह्यात राबवली जात आहे. शासनाने या पाच वर्षात गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली आहे यामध्ये राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश आहे जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात जवळपास 54 गावात ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाकडून डंके की चोट पर राबवली जात आहे.या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या कामासाठी शासन गरीब शेतकऱ्यांना अनुदान देऊन करते अनेक शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत असून अनेकांना या योजनेअंतर्गत अनुदान देखील शासनाने देऊ केले आहे.
मात्र असे असले तरी या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधार नोट लींकिन चा प्रॉब्लेम येत असल्याने राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना ही योजना केवळ एक मोहजाल सिद्ध होत असून शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते की काय असा प्रश्न पडला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी मायबाप सरकारने पोखरा ऑफिशियल साइटवर येत असलेल्या या अडचणी दूर करणे आवश्यक असून शेतकऱ्यांना अनुदानासाठी पात्र असून देखील जे हेलपाटे मारावे लागत आहेत त्यापासून शेतकऱ्यांना मुक्तता द्यावी अशी मागणी यावेळी मायबाप सरकारकडे शेतकरी बांधव करत आहेत.
Share your comments