1. बातम्या

PMJDY: महिला लाभार्थ्यांच्या खात्यात आज येणार ५०० रुपयांचा दुसरा हप्ता

कोविड -१९ (COVID-19) च्या संकटामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेक योजना सुरू केल्या. यातील एक योजना होती ती म्हणजे जनधन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला खातेदारांच्या खात्यात ५०० रुपये सरकराकडून टाकण्यात येतील. या योजनेतून जनधन खात्यात आता दुसरा हप्ता देण्यात आला आहे.

KJ Staff
KJ Staff

 

कोविड -१९ (COVID-19) च्या संकटामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर अनेक योजना सुरू केल्या. यातील एक योजना होती ती म्हणजे जनधन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला खातेदारांच्या खात्यात ५०० रुपये सरकराकडून टाकण्यात येतील. या योजनेतून जनधन खात्यात आता दुसरा हप्ता आला आहे.  पंतप्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत महिला खातेधारकांना ५०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे.

वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “लाभार्थींनी बँक आणि सीएसपीला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या वेळापत्रकांचे अनुसरण करण्याची विनंती केली आहे. एटीएम व बीसीद्वारे पैसेही काढता येतात.  वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी ट्विटवरुन याची माहिती दिली आहे.  लाभार्थींनी दिलेल्या वेळापत्रकांचे अनुसरण बँक आणि सीएसपीला भेट द्यावी. एटीएम व बीसीद्वारे पैसेही काढता येतील अशी माहितीही त्यांनी दिली आहे.  बँक शाखांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून लाभार्थ्यांनी वेळापत्रकानुसार पैसे काढण्यासाठी बँकेत जावे.  जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग राखण्यायस मदत होईल, असेही ते म्हणाले.

PMJDY: When to withdraw money  कधी मिळणार पैसे

वेळापत्रकानुसार, प्रधानमंत्री जन धन योजनेतील महिला खातेधारकांचा खाते क्रमांकाचा शेवटचा अंक हा ० ते १ आहे त्यांना ४ मे रोजी पैसे मिळतील.  तर ज्या खातेधारकांचा खाते क्रमांकाचा शेवटचा अंक हा २ ते ३ असेल त्यांना ५ मे रोजी पैसे मिळतील.  अशाचप्रकारे  जे खातेक्रमांकाचा शेवटचा अंक हा ४ किंवा असेल त्यांना ६ तारखेला तर  ज्या खाते क्रमांकाचा शेवटचा अंका हा ६ आणि ७ असेल तर ८ मे रोजी त्यांना पैसे मिळतील.  आणि ७ आणि ८ अंक असलेल्या खातेधारकांना ११ मे रोजी पैसे मिळतील, असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.  इमर्जन्सी मध्येही काही महिला पैसे काढू शकतात. पण त्यांनी बँकेच्या वितरणाच्या नियम पाळले पाहिजे.  पीएमजेडीवाय लाभार्थी ११ मे नंतर त्यांच्या सोयीनुसार कोणताही दिवस मागे घेऊ शकतात.  पंतप्रधान जन धन योजना लाभार्थ्यांनी शाखांमध्ये गर्दी टाळावी. रुपे कार्ड, बँक मित्र आणि ग्राहक सेवा बिंदू (सीएसपी) सह आसपासच्या एटीएम वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

English Summary: PMJDY Women Beneficiaries Get Second Installment of Rs 500 Published on: 04 May 2020, 09:08 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters