पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करतील ,तिथे ते 'नागपूर मेट्रो टप्पा I' राष्ट्राला समर्पित करणार आहेत.
या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -II’ ची पायाभरणीही करतील. सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करतील. सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूर चे राष्ट्रार्पण होणार आहे.
नागपुरातील एका जाहीर कार्यक्रमात, सकाळी 11:30 वाजता, 1500 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
ते राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करतील.या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ,केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था , चंद्रपूर’ राष्ट्रार्पण आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र , चंद्रपूर’ चे लोकार्पण करणार आहेत.
गोव्यात, दुपारी 3.15 वाजता, पंतप्रधान 9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते तीन राष्ट्रीय आयुष संस्थांचे उद्घाटनही करतील. संध्याकाळी 5:15 वाजता पंतप्रधान, गोवा येथील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करणार आहेत.
नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान करणार आहेत. समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन द्रुतगती मार्ग प्रकल्प, हे देशभरातील सुधारित कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसंदर्भातील पंतप्रधानांचा दृष्टीकोन साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
सुमारे 55,000 कोटी रुपये खर्च करून बांधला जात असलेला 701 किमीचा हा द्रुतगती मार्ग - हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो.या द्रुतगती मार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांची संपर्क सुविधा सुधारण्यास मदत होईल. हे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी साहाय्यकारी आहे.
पीएम गती शक्ती अंतर्गत पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणीच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाचा पुरस्कार करत, समृद्धी महामार्ग हा दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार इत्यादी पर्यटन स्थळांना जोडेल. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी गेमचेंजर ठरेल.
देशभरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या सोयी यांची उभारणी करण्यासाठी पंतप्रधान मोदी सातत्याने प्रयत्नशील असतात. याच दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी या विमानतळाच्या उभारणीच्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.
सुमारे 2,870 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा विमानतळ शाश्वत पायाभूत सुविधांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर बांधण्यात आला असून त्यात सौर उर्जा संयंत्रे, पर्यावरण स्नेही इमारती, धावपट्टीवर एलईडी दिवे, पर्जन्य जल संधारण, पुनर्वापर प्रक्रियेच्या व्यवस्थेसह अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांसह अशा इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.
सुट्टीत या राशींचे भाग्य चमकणार; लक्ष्मी मातेची होणार जोरदार कृपा
Share your comments