पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान डिजिटल हेल्थ मिशन लॉन्च केले. त्यांनी आज व्हीसी द्वारे ही योजना सुरू केली. या योजनेचा प्रमुख उद्देश असा आहे की देशभरातील प्रत्येक नागरिकाला एक युनिक आरोग्य ओळख पत्र देणे हा आहे.
जेणेकरून या माध्यमातूनदेशव्यापी डिजिटल आरोग्यइकोसिस्टीम तयार करता येईल.या मिशनच्या माध्यमातून आरोग्य सेवा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवू शकेल.
याअंतर्गत सरकार प्रत्येक नागरिकाला एक युनिक आरोग्य कार्ड उपलब्ध करून देणार आहे.हे कार्ड आधार कार्ड सारखे असेल.
आधार क्रमांक वरचा नंबर असतो त्याचप्रमाणे या आरोग्य कार्ड वर देखील एक नंबर असेल.या नंबर च्या सहाय्याने संबंधित व्यक्तीची ओळख आरोग्य क्षेत्रात सर्वत्र दिसेल.
या हेल्थ कार्ड चा उपयोग
तुमच्याकडे युनिक हेल्थ कार्ड असणे हे तुमच्यासाठी आणि डॉक्टर दोघांसाठी उपयुक्त ठरेल. हे कार्ड सोबत असल्यामुळे तुम्हाला डॉक्टरांना भेटण्यासाठी तुमची मेडिकल फाईल सोबत नेण्याची गरज राहणार नाही. या तुमच्या कार्डवर डॉक्टर तुमचा आयडी पाहतील आणि आजाराचा संपूर्ण डेटा काढतील आणि
त्यानंतर त्या आधारावर पुढील उपचार सुरू करतायेईल. या कार्डद्वारे रुग्णाला आयुष्यमान भारत अंतर्गत तुमच्या सुविधांचा लाभ मिळतो की नाही हे जाणून घेणे शक्य होईल. तसेच संबंधित रुग्णाला आरोग्य संबंधित विविध कोणकोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो हेही आरोग्य कार्ड वरून समजेल.
Share your comments