नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विशेष गुणधर्म असलेल्या 35 पिकांच्या विविध प्रजातींची भेट दिली आहे. एका कार्यक्रमात ते व्हिसी च्या माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केंद्रीय कृषिमंत्र्यांनी म्हटलेकी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात पंतप्रधान पिक विमा योजनेतून जवळजवळ 99 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. तसेच पीएम किसान सम्मान निधि योजना तुन एक लाख 58 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी 35 प्रकारच्या प्रकारांची माहिती ट्विटरवरून दिली. त्यांनी सांगितले की विशेष गुणधर्म असलेल्या या पिकांची निर्मिती आयसीएआर नी केली आहे.
सी आर ने विकसित केलेले पिके दुष्काळ, अतिवृष्टी सारख्या परिस्थितीतही उत्तम टिकतील आणि चांगले उत्पादन देतील अशी ही नवी पिके आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल.या पिकांमध्ये दुष्काळात टिकाव धरतील असे हरभरा चे वान, लवकर येणारे सोयाबीन, रोगांना प्रतिकारक असं भात, गहू, बाजरीइत्यादी पिकांचा यामध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर शेतीशी संबंधित आव्हाने सोडवण्यासाठी प्राधान्याने केला जात आहे. आमचे लक्ष अधिक पौष्टिक बियाण्यांवर आहे,नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे बदलत्या हवामानाला तोंड देणे. शेतकऱ्यांच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी जवळजवळ 11 कोटी मृदा आरोग्य कार्ड त्यांना वेगवेगळ्या टप्प्यात देण्यात आले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी त्यांना बँकांमार्फत मदत मिळवणे सोपे झाले आहे. आज-काल शेतकऱ्यांना हवामानाची माहिती चांगल्या प्रकारे मिळत आहे. तसेच दोन कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मोहीम राबवून किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत.एम एस पी वाढवण्याबरोबरच आम्ही खरेदी प्रक्रियादेखील सुधारणा केल्या आहेत प्रक्रिया देखील चांगल्या सुधारणा केल्या आहेत. जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळू शकेल.
Share your comments