शेतकरी आंदोलनाचा आता गरीब शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेद्वारे दिला जाणारा तिसरा हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तीन महिन्यांचे पैसे महिन्याच्या पहिल्या १० ते १५ दिवसात वळते केले जातात. ही रक्कम एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली जाते. मात्र डिसेंबर अर्धा संपत आला तरीही अद्याप बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेल नाहीत. केंद्र सरकारने पहिले दोन हप्ते १५ दिवसांच्या आत खात्यात वळते केले होते. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटात शेतीसाठी साहित्य, बियाणे, आदींची खरेदी करण्यास मदत झाली होती.
कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांने माध्यमांना सांगितले की, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात या वेळचा ६ हजार रुपयांचा हप्ता टाकण्यासाठीची सर्व तयारी झाली आहे. पण आम्हाला वरुन आदेश आलेला नाही. त्याची आम्ही वाट पाहत आहोत. हा पैसा एकरकमी टाकायचा आहे की टप्प्याटप्प्याने याबाबत सूचना येणारे आहे, याविषयीचे वृत्त एनबीटीने दिले आहे. शेतकरी आंदोलनामुळे मंत्रावयाते वरिष्ठ अधिकारी व्यस्त आहेत. पीएम -किसान योजनेचे पैसे देण्यास होणाऱ्या विलंबाला हे देखील एक कारण असू शकते, असे म्हणाला. दरम्यान गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये दिला जाणार हप्ता जानेवारीत दिला गेला होता. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मोठ्या समारंभाचे आयोजन करत हा हप्ता वितरित केला होता.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत हे पैसे दिले जातात. राज्य सरकारे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा महसूल रेकॉर्ड, आधार नंबर आणि बँक खात्याची माहिती तपासते. राज्य सरकार ही पडताळणी केल्यानंतर एफटीओ तयार होतो आणि केंद्र सरकार त्यात पैसे वळते करते. दरम्यान या योजनेपासून अद्याप १.३ कोटी शेतकरी वंचित आहेत. कारण त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत. किंवा त्यांचे आधारकार्ड नाही. नाव चुकले असल्याने त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास अडचणी येत आहेत. जर या दुरुस्त्या झाल्या तर ११.३५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान किसान योजना फॉर्म २०२० सुधारित करण्याची प्रक्रिया-
प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
आपल्या स्क्रीनवर एक वेब पृष्ठ दिसून येईल.
मेनू बारवरील किसान शेतकरी टॅबवर क्लिक करा.
ड्रॉप डाऊन सूचीतील शेतकरी तपशील संपादित करा पर्यायावर क्लिक करा. आपला आधार क्रमांक आणि संबंधित फील्डमध्ये कॅप्चा कोड नमूद करा.
शोध बटणावर क्लिक करा. पुढील माहिती अपडेट करा.
Share your comments