पीएम किसान सन्मान निधीच्या (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) आगामी म्हणजे 11व्या हफ्त्याची शेतकरी बांधव (Farmers) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मोदी सरकारच्या (Central Government Scheme) या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी देशभरातील 12.5 कोटी शेतकरी पात्र आहेत.
आता हे करोडो शेतकरी बांधव 11 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पीएम किसान निधी योजना सुरू केली होती.
गेल्या वर्षी 15 मे रोजी मिळाले होते 2 हजार
या दरम्यान असे सांगितले जात आहे की, पीएम किसानचा 11 वा हप्ता एप्रिल ते जुलै यादरम्यान येणार आहे. गेल्या वर्षी 15 मे रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली होती.
मात्र यावेळी याबाबत अधिकृत अपडेट आलेले नाही. दुसरीकडे, ई-केवायसी (eKYC) ची अंतिम तारीख 31 मार्चवरून आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, खालील 5 कारणांमुळे PM किसान निधीचा हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.
E-kyc अनिवार्य
मित्रांनो या योजनेत लागू करण्यात आलेल्या नवीन नियमावलीनुसार बोलायचे झाले तर यावर्षी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याबाबत कोणतीही सक्ती नव्हती. यामुळेच पीएम किसानचा 11वा हप्ता हा लांबणीवर पडू लागल्याचे मानले जात आहे.
यापूर्वी, केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख पाहिली तर ती 31 मार्च होती, जी आता 31 मे करण्यात आली आहे. पीएम किसान पोर्टलला भेट देऊन तुमची केवायसी केल्यानंतर तुम्ही या योजनेचा फायदा मिळवू शकणार आहात.
शेतीयोग्य जमीन
या योजनेच्या सुरुवातीला केवळ 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनाचं पीएम किसान निधीसाठी मंजुरी देण्यात येतं होती म्हणजे हेच शेतकरी या योजनेसाठी पात्र होते. पण आता ही पात्रता राहणार नाही.
आता या योजनेसाठी सर्व शेतकरी नोंदणी करू शकणार आहेत. यामुळे देखील 11व्या हप्त्यासाठी विलंब होतं असल्याचे सांगितले जातं आहे.
अपात्र लाभार्थीकडून वसुली
जे सरकारी नोकरी करतात किंवा ITR फाईल करतात त्यांच्याबद्दल बोलायचे झालं तर असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसणार. मध्यँतरी पीएम किसान निधीचा लाभ सरकारी नोकरदाराला मिळत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली होती.
त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांकडून निधीचे पैसे परत वसुल केले जातं आहेत. यामुळे देखील 11व्या हप्त्याला उशीर होतं असल्याचे सांगितले जात आहे.
किसान क्रेडिट कार्डमध्ये बदल केले जातात
किसान क्रेडिट कार्ड ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना मानली जाते. याअंतर्गत शेतकऱ्यांना माफक दरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सरकार कडून केले जातं आहे.
ही योजना पीएम किसान सम्मान निधि योजनेला संलग्न केली जात आहे. यामुळे देखील पीएम किसान योजनेचा अकरावा हफ्ता उशिरा शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments