Pm Kisan Yojana: देशातील 12 कोटीहुन अधिक पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर येतं आहे. पीएम मोदी लवकरच पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता जारी करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये जोर पकडू लागली आहे.
पीएम किसान 12 व्या हप्त्यासाठी पैसे कधी येणार?
पीएम किसानचा पुढचा हप्ता म्हणजेचं 12वा हफ्ता ऑगस्टमध्ये येणार आहे. वास्तविक, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, तर पुढील हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो.
त्याच वेळी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातील. त्यानुसार, या महिन्याच्या अखेरीस पीएम किसान खात्याचा 12 वा हप्ता उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान येईल.
तुमचे अॅप जलद अपडेट करा
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर ती आता लगेचच सोडवता येणार आहे. यासाठी हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून किंवा मेल आयडीवर मेल केला जाऊ शकतो. संबंधित शेतकरी बांधव पीएम किसान च्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क करून आपली तक्रार नोंदवू शकतात. तुम्ही तुमच्या तक्रारी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर पाठवू शकता. तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकता.
तुमची हप्त्याची स्थिती कशी तपासायची
हफ्त्याची स्थिती पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसान वेबसाइटवर जा.
आता Farmers Corner वर क्लिक करा.
आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.
येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.
यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.
Share your comments