पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. सरकारच्या या योजनेतून शेतकरी आपली आर्थिक अडचण दूर करुन शेतीसाठी लागणारी सामुग्री घेत असतो. शेतकऱ्यांना हा पैसा दोन- दोन हजार रुपयांच्या हप्त्याने दिले जातात. हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतर केले जातात. परंतु या योजनेसाठी काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.
या अटींच्या आधारे हे ठरवले जाते की कोणाला लाभ मिळेल आणि कोण मिळणार नाही. असाच एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात राहतो की जर या योजनेसाठी पती -पत्नीने एकत्र अर्ज केला तर काय होईल?
हेही वाचा : PM-Kusum Scheme : नापीक जमिनीवर वीज तयार करुन विका सरकारला अन् कमवा पैसे, जाणून घ्या किती असेल दर
नियमांनुसार, पती आणि पत्नी दोघेही एकाच वेळी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. याचे कारण कुटुंबातील फक्त एका सदस्याला लाभ मिळू शकतो. येथे हे लक्षात घ्यावे लागेल की भारतातील कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि मुले.दुसरीकडे, जर पती -पत्नी दोघांनाही कुटुंबात हप्ता मिळत असेल तर तो नियमानुसार वसूल केला जाऊ शकतो. जर ही माहिती सरकारच्या डोळ्यात आली तर वसुली करता येईल. यासह, लाभार्थी देखील यादीतून वगळला जाईल.
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते जारी करण्यात आले आहेत. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले पण त्यांना लाभ मिळू शकलेला नाही. काही चुका आहेत ज्या अर्जामध्ये केल्या, ज्यामुळे हप्ता रोखला जातो. उदाहरणार्थ, अर्जदाराचे नाव आणि बँक खात्यातील अर्जदाराचे नाव सारखे नाहीत.
Share your comments