PM Kisan या योजनेचा 2000 चा हप्ता बैंक खात्यात जमा होत नसल्यास मदत केंद्रावर आपली तक्रार नोंद करा

26 November 2020 12:02 PM By: KJ Maharashtra

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना ( PM Kisan) भारत सरकारची खुप महत्तवकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील शेतक-यांच्या खात्यात दर वर्षाला तीन हप्त्यात 6000 रूपये रक्कम जमा करतात. याच प्रकारे सरकार दर चार महिन्यात एक वेळा शेतक-यांच्या खात्यात 2000 रूपयाचा हप्ता जमा करते. चालू वित्त वर्षामध्ये सरकारने एप्रिल आणि ऑगस्ट मध्ये एक-एक हप्ता पाठवला गेला आहे. आत्ता डिसेंबर ते मार्च मध्ये चालू वित्त वर्षात तिसरा आणि शेवटचा हप्ता पाठवला जाईल. सरकार कडून रक्कम पाठवली जाते त्यामुळे शेतक-यांना खुप मदत मिळते.

तरीही ब-याच वेळा काही तांत्रिक अडचणी, डाटा मध्ये काही प्रकारची चुक, आधार नंबर, अकांउट नंबर मध्ये आयएफएससी कोड चुकीचा असल्या कारणाने हप्ता पात्र लाभार्थी शेतक-यापर्यंत पोहचत नाही. तर काही वेळा रजिस्ट्रेशन केल्यावर सुध्दा अधिका-यांना संतुष्टि मिळत नसल्याने आपले नाव पीएम किसान च्या लाभार्भी यादीमध्ये येेत नाही. अशा परिस्थितीत आपण पीएम किसानच्या वेबसाइटवर उपलब्ध मदत केंद्राचा वापर कोणत्या प्रकारे कशा पध्दतीने करावा.

1) यासाठी आपल्याला अगोदर PM Kisan च्या वेबसाइटवर लॉग इन करावे.

2) त्यानंतर 'Farmer's Corner' मध्ये जावे.

3) 'Farmer's Corner' मध्ये सगळ्यात खाली आपल्याला 'Help Desk' असे ऑप्शन दिसेल.

4) 'Help Desk' ऑप्शनवर क्लिक करावे.

5) येथे आपल्या समोर नवीन पेज उघडेल.

6) या पेजवर जर आपण पहिल्यांदा तक्रार नोंदत असाल तर 'Register Query' हे ऑप्शन वरती जावे.

7) त्यानंतर Aadhaar Number, Account Number आणि मोबाइल नंबर याच्यामधून कोणत्याही एका पर्यायावर जावे.

8) आपण ज्या पर्यायाला गेलेलो आहोत त्याच्या खाली ठिकाणी तो नंबर टाकावा आणि त्यानंतर 'Get Details' वर क्लिक करावे.

9) यानंतर आपली तक्रार नोदंवली जाईल.

 

हेही वाचा:नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावात किंचितशी सुधारणा


आपली तक्रार नोंद झाली असेल तर आपले स्टेटस या पध्दतीने चेक करावे:

1) 'Help Desk' ऑप्शन मध्ये आपल्याला स्टेटस चेक करायचे पर्याय मिळेल.

2) त्यानंतर 'Help Desk' वर क्लिक केल्यानंतर जे नवीन पेज उघडेल, त्यावर 'Know the Query Status' ला निवड करावी.

3) त्याच्या नंतर 'Query ID', आधार नंबर, अकांउट नंबर किंवा मोबाइल नंबर टाकून आपण आपली तक्रार स्थिती बघू शकतात.

Scheme PM-KISAN
English Summary: pm kisan yojana complaint number and more information

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.