1. बातम्या

Pm Kisan Yojana : ब्रेकिंग! पीएम किसान योजनेबाबत आताची सर्वात मोठी बातमी! 'या' लोकांना वापस करावे लागतील पैसे

Pm Kisan Yojana : जर तुम्ही नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या (Modi Sarkar Yojana) महत्वाकांक्षी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. मित्रांनो पीएम किसान योजनेचा (Farmer Scheme) लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना (Farmer) पीएम किसान निधीचे पैसे परत करावे लागणार आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
pm kisan latest news

pm kisan latest news

Pm Kisan Yojana : जर तुम्ही नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या (Modi Sarkar Yojana) महत्वाकांक्षी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) लाभ घेत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे.

मित्रांनो पीएम किसान योजनेचा (Farmer Scheme) लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना (Farmer) पीएम किसान निधीचे पैसे परत करावे लागणार आहेत.

ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्येने आहेत. उत्तर प्रदेशमध्ये या योजनेचा (Yojana) लाभ घेणारे 21 लाख शेतकरी तपासणीत अपात्र आढळले आहेत. या योजनेंतर्गत (Agricultural Scheme) आतापर्यंत या शेतकऱ्यांना दिलेली रक्कम सरकार वसूल करणार आहे.

पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जारी केला जाईल आणि ज्या शेतकऱ्यांचे भुलेख मार्किंग आणि साइटवर पडताळणीचे काम पीएम किसान पोर्टलवर अपलोड केले जाईल त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून 2 कोटी 85 लाख शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली होती, त्यापैकी 21 लाख शेतकरी पडताळणीत अपात्र आढळले आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत त्यांना दिलेली रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणार आहे.

अनेक लाभार्थींना आयकर भरल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले आहे, तर अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघेही या निधीचा लाभ घेत होते. या योजनेचा परिवारातील एकच लाभ घेऊ शकतो.

पैसे कोणाला परत करावे लागतील बर?

आजकाल पीएम किसान योजनेबाबत अनेक प्रकारची फसवणूक होत आहे. यासोबतच अनेक अपात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून, शासनाची फसवणूक करून या योजनेचे पैसे कोणी घेत असतील तर आतापर्यंत मिळालेले सर्व हप्ते शासनाकडून वसूल केले जातील.

यादीत तुमचे नाव अस तपासा-

सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

त्यानंतर Farmer Corner वर क्लिक करा.

आता तुम्हाला रिफंड ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.

आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.

आता तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर Get Data वर क्लिक करा.

हा संदेश स्क्रीनवर दिसेल

ही प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर 'तुम्ही कोणत्याही परताव्याच्या रकमेसाठी पात्र नाही' (You Are Not Eligible For Any Refund Amount) असा संदेश दिसेल. असे लिहिले असेल तर पैसे परत करावे लागणार नाहीत. त्याच वेळी, जर परतावा (Refund) असा पर्याय दिसत असेल, तर तुम्हाला पैसे परत करावे लागतील.

English Summary: pm kisan yojana breaking farmer have to return money Published on: 10 September 2022, 09:01 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters