किसान सहाय्यता निधीच्या अंतर्गत दरवषी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची रक्कम आर्थिक सहाय्यता म्हणून दिली जाते. ही रक्कम सरकार तीन हप्त्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात 4-4 महिन्यांनी जमा करते. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये जमा केले जातात. आता केंद्र सरकार 11 व्या हप्त्यातील रक्कम होळीनंतर कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या - कम नहीं होगा साला..! केंद्र सरकारच्या 'त्या' निर्णयानंतर कांदा तेजीतच
आनंदाची बातमी: 8 फळपिकांसाठी विमा योजना, राज्य सरकारचा मोठा निर्णय
'या' गोष्ट पूर्ण करा
आता पंतप्रधान किसान पोर्टलवर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रक्कमेचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतरच तुम्ही स्टेटस आणि पुढील तपशील पाहू शकाल. याशिवाय यात करण्यात आलेल्या दुसऱ्या बदलात लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर 11व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लवकरच आपले ई-केवायसी अपडेट करा. तुम्ही याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या - मोठी बातमी : ७/१२ उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब; सरकारचा मोठा निर्णय
Google pay Loan : फक्त एका क्लिकवर मिळणार 1 लाखांपर्यंतचे कर्ज ! असा करा अर्ज आणि घ्या लाभ
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीने 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
Share your comments