1. बातम्या

PM Kisan : फक्त वीस दिवसात ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आला २ हजार रुपयांचा हप्ता

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकला गेला आहे. दरम्यान नोव्हेंबरपर्यंत आपल्या बँक खात्यात पैसा येईल. मागील वीस दिवसात ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २ - २ हजार रुपये टाकण्यात आले आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकला गेला आहे. दरम्यान नोव्हेंबरपर्यंत आपल्या बँक खात्यात पैसा येईल. मागील वीस दिवसात ३० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २ - २ हजार रुपये टाकण्यात आले आहे.  ऑगस्ट महिन्यात जवळजवळ ८ कोटी ८१ लाख लाभार्थ्यांना  योजनेचा लाभ मिळला. दरम्यान आपल्या बँक खात्यात पैसे आले नसतील तर एकदा आपल्या जवळील बँक शाखेत जाऊन आपल्या खात्याविषयी चौकशी करु घ्यावी.

या योजनेच्या अंतर्गत ३० ऑगस्टपर्यंत साधरण १० कोटी ५० लाख शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. अर्जदारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अर्जासह पुरवली पाहिजे. दिलेल्या कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती नसावी. आपले नाव, बँक क्रमांक, आधार क्रमांक व्यवस्थित नोंदवावा. जेणेकरून आपल्या बँक खात्यात पैसे टाकण्यास कोणतीच अडचण येणार नाही. 

पीएम किसान योजनेस कोण आहे अपात्र

दरम्यान , या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर शेत जमीन असावी, पण जर तो व्यक्ती कुठे सरकारी नोकरीवर किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसेल. यासह जर व्यक्ती माजी आमदार, खासदार किंवा मंत्री असेल तेही या योजनेसाठी पात्र नसतील. जर अर्ज करणारा  व्यक्ती हा परवानाधारक डॉक्टर असेल, अभियंता, वकील, चार्टट अकांउंटट  असेल तर तोही या योजनेस पात्र नसेल. यासह जर आपल्या  या योजनेच्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीन असणे आवश्क असते.  जर शेत जमीन आजोबांच्या  किंवा शेतकऱ्याच्या वडिलांच्या  नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळत नाही.

काय आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असून त्यांना या योजनेतून आर्थिक साहाय्य दिले जाते.  साधारण १४ कोटी शेतकऱ्यांना या योजनेतून निधी दिला जात आहे.  शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर आहे.  यातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाते.

कशाप्रकारे मिळणार पीएम किसान योजनेचा पैसा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.  पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते.

कसा करणार (पीएम किसान)  पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी  अर्ज -

योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

English Summary: PM Kisan : thirty lakh farmer get two thousand rupees in twenty days Published on: 02 September 2020, 11:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters