1. बातम्या

शेतकऱ्यांच्या खात्यात आले पीएम किसान सन्मान निधीचे पैसे

गुरुवारी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे आले. यावर्षाचा २००० हजार रुपयांचा दुसरा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. याआधी लॉकडाऊनच्या दरम्यान पीएम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची पाचवी आणि या अर्थवर्षाचा पहिला हप्ता देण्यात आला होता.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


गुरुवारी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे आले. यावर्षाचा २००० हजार रुपयांचा दुसरा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. याआधी लॉकडाऊनच्या दरम्यान पीएम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची पाचवी  आणि या अर्थवर्षाचा पहिला हप्ता देण्यात आला होता. पीएम किसान सम्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना मोदी सरकार तीन हप्त्यात ६ हजार रुपये देत असते. या योजनेंर्गंत ८ जून पर्यंत ९ कोटी ८३ लाख शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारने केली आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजना मोदी सरकारने २४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करत असते. या योजनेचा पहिला हप्ता हा १ डिसेंबर ते ३१ मार्चच्या दरम्यान येत असतो. दुसरा हप्ता  हा एक एप्रिल ते ३१ जुलै आणि तिसरा हप्ता  १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर पर्यंत येत असतो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम येत असल्याने यात कोणताच प्रकारची फसवणूक होत नाही.

दरम्यान जर कोणत्या शेतकऱ्याचा चालू हप्ता मिळालेला नाही. अर्जात काही तुटी असल्यास आणि तुटी आपण दुरुस्त केल्यास आपल्याला पैसे मिळतात. याविषयी माहिती स्वत सरकारने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. (https://pmkisan.gov.in/Documents/RevisedFAQ.pdf) यात स्पष्ट सांगण्यात आले आहे की, लाभार्थ्याचे नाव  पीएम किसानच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. परंतु कोणत्या तरी कारणामुळे ते चार महिन्यापासून हप्ता येत नाही. तर सदर तुटी दूर केल्यास लाभार्थ्याला पैसे मिळतील.  जर अर्ज केला तरी पैसे मिळत नसतील तर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या हेल्पलाईन (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526 (Toll Free) वर संपर्क करावा.

कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

English Summary: pm kisan scheme : money transfer in farmers account directly Published on: 19 June 2020, 06:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters