नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हफ्ता जमा केला. राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा निधी दिला जातो. शेतकऱ्यांना हा निधी तीन हप्त्यात दिला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे या योजनेचे स्वरूप आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना विषयी आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
प्रसारमाध्यमांमधून आता असे समोर येत आहे की या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उचलला आहे आता अशा अवैध शेतकऱ्यांना या योजनेचा निधी परत करावा लागणार आहे. पीएम किसान सम्मान निधि या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा ज्या बनावट शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे त्यांच्यावर केंद्र सरकार कठोर कार्यवाही करण्याच्या मूडमध्ये असल्याचे समोर येत आहे. केंद्र सरकार या योजनेच्या बनावट शेतकऱ्यांकडून पैसे परत घेणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पीएम किसान सम्मान निधि योजनेचा सुमारे देशातील सात लाख बनावट शेतकऱ्यांनी अवैधरित्या लाभ घेतला आहे, या सात लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता दिला गेला आहे. यामध्ये पती-पत्नी दोघे, मृत व्यक्ती इत्यादींची नावे फसवणूक करून फायदा उचलण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत आता ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या लाभदायी योजनेचा फायदा उचलला आहे त्यांची माहिती जमा केली जाणार आहे, आणि या सात लाख शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्याकडून योजनेचा निधी परत मागवला जाणार आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी समोर येत आहे की, भारत सरकारचे कृषी मंत्री माननीय नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, ज्या शेतकऱ्यांनी अवैधरित्या या योजनेचा लाभ घेतला आहे त्या शेतकऱ्यांची ओळख पटवण्याचे कार्य सुरू आहे आणि त्यांची माहिती समोर येताच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल व वितरित केलेला निधी परत त्यांच्या कडून प्राप्त करून सरकार दरबारी जमा करण्यात येईल.
Share your comments