पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) हे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना देशाचे माननीय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत एक जानेवारी रोजी देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले. पीएम किसान सम्मान निधि योजना ही योजना केंद्राद्वारे राबविण्यात येते. या योजनेसाठी संपूर्ण निधी केंद्र प्रदान करत असते.
अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी (For the welfare of minority and poor farmers) सुरू करण्यात आलेल्या या योजनेत चुकीच्या पद्धतीने अनेक अपात्र शेतकऱ्यांनाही लाभ घेतले असल्याचे नुकतेच समोर आले आहे. अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे केंद्र सरकारला सूचित होताच त्यांनी या संदर्भात कारवाई करत ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून योजनेची रक्कम वसूल करण्याचे धोरण आखले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात कडक कारवाई करत अपात्र शेतकऱ्यांकडून योजनेची रक्कम वसूल करण्यास सुरुवात देखील केली आहे. एक जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना योजनेचा दहावा हप्ता सुपूर्द करण्यात आला. तसेच येत्या एप्रिलमध्ये या योजनेचा अकरावा हप्ता येणार असल्याची माहितीदेखील समोर येत आहे. या योजनेचा अकरावा हप्ता प्राप्त करण्यासाठी या योजनेचे पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळेच ज्या शेतकऱ्यांनी अजून केवायसी केलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी.
केंद्राद्वारे ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यासाठी महसूल विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातही अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील अपात्र शेतकऱ्यांपैकी जवळपास दोन हजार शेतकऱ्यांनी योजनेचे पैसे सरकारदरबारी जमा केले आहेत. जिल्ह्यातील जवळपास दोन लाख चार हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत योजनेचा दहावा हफ्ता वितरित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. बीड जिल्ह्यात 40 कोटी 83 लाख रुपयांचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला गेला आहे. जिल्ह्यातील 2090 शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत, मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की या शेतकऱ्यांनी या योजनेचा पैसा सरकारदरबारी सुपूर्दही केला आहे.
या अपात्र शेतकऱ्यांनी दोन कोटी एक लाख रुपये परत केले आहेत. या योजनेत सुरू असलेल्या या धांदळी मुळे अनेक शेतकऱ्यांना आपण पात्र आहोत की नाही याबाबत संभ्रमता आहे म्हणून आपण या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे खाली दिलेल्या लिंक वर जाऊन चेक करू शकता.
शेतकरी मित्रांनो PM Kisan Yojna साठी पात्र आहात की नाही येथे क्लिक करून चेक करा
Share your comments