केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना हि कल्याणकारी योजना अंमलात आणली आहे. ह्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक तीन हफ्त्यात दिले जातात. म्हणजे दोन हजार रुपयेचा एक हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार जमा करत असते. ह्या योजनेद्वारे आता पर्यंत 9 हफ्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आणि आता अशी बातमी समोर येत आहे की ह्या योजनेचा दहावा हफ्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

10व्या हफ्त्यासाठी शासनाने जमा केला आहे एवढा निधी
मोदी सरकारची महत्वाकांशी योजनेपैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. ह्या योजनेचा 10 व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने आधीच 22 हजार कोटी रुपयांची व्यवस्था करून ठेवली आहे. या योजनेचा पुढील हप्ता येत्या आठवडयात शेतकऱ्यांना देऊ करण्यासाठी सरकार दरबारीं सर्व तयारी पूर्ण केली गेली आहे. देशातील करोडो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यासाठी आता केवळ काही औपचारिकता उरल्या आहेत.
ह्या योजनेत आतापर्यंत एवढे पैसे झालेत वितरित
आत्तापर्यंत मोदी सरकारने पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत भारतातील सुमारे 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये डायरेक्ट पाठवले आहेत. ह्या योजनेत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये देते. अनेक शेतकऱ्यांना ह्या योजनेचा नववा हफ्ता मिळाला नव्हता, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात एकाच वेळी दोन हप्ते मिळू शकतात. म्हणजे त्यांना नववा आणि दहावा असे दोन्ही हफ्ते सोबतच मिळू शकतात. त्यामुळे जे शेतकरी नवव्या हफ्त्यापासून वंचित राहिले होते त्यांना फायदा मिळणार आहे.
Share your comments