पीएम किसान सम्मान निधि (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) योजनेअंतर्गत लाभ उचललेल्या शेतकऱ्यांसाठी आजची बातमी विशेष आहे. केंद्र सरकारद्वारे पीएम किसान सम्मान निधि योजने अंतर्गत देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये प्रदान केले जातात. या योजनेअंतर्गत वार्षिक दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्याद्वारे पात्र शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. आपल्या राज्यातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेसाठी अनेक शेतकरी बांधव नियमांचे पालन न करता लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
सरकारने अशा अपात्र शेतकऱ्यांविरोधात कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उचलला आहे त्यांच्याकडून योजनेची संपूर्ण रक्कम वसूल केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना वापस करावा लागेल योजनेचा पैसा
•मित्रांनो जर आपल्या परिवारातील एकापेक्षा अधिक सदस्य पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर आपण या योजनेसाठी अपात्र आहात, आणि म्हणून आपणास या योजनेचा पैसा वापर करावा लागणार आहे.
•शेतकरी मित्रांनो जर आपल्या परिवारातून पती-पत्नी किंवा मुलगा हे सर्व या योजनेचा लाभ घेत असतील तर आपणास एक सदस्य वगळता इतर सर्व सदस्यांचा या योजनेचा पैसा वापस करावा लागणार आहे. या योजनेअंतर्गत परिवाराचा केवळ एकच सदस्य लाभ घेऊ शकतो.
•पीएम किसान सम्मान निधि योजनेत केंद्र सरकारने अमुलाग्र बदल केला आहे. आता केवळ त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे, अर्थात केवळ सातबारा धारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
•शेतकरी मित्रांनो जर आपल्या परिवारातून एखादा सदस्य करदाता असेल तर आपणास या योजनेचा लाभ घेता येणार नाही. परिवार म्हणजे पती-पत्नी आणि नाबालिक मुलगा. जर आपल्या नावावर शेतीयोग्य जमीन अर्थात शेत जमीन नसेल परंतु आपल्या आई वडिलांच्या नावावर शेतजमीन असेल तरीदेखील आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
•जर एखादा शेतकरी सरकारी नोकरी करत असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेपासून वंचित करण्यात आले आहे.
•रजिस्टर डॉक्टर, इंजिनिअर, सीए यांना देखील या योजनेपासून वंचित केले गेले आहे.
•एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक दहा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेपासून वंचित करण्यात आले आहे.
Share your comments