केंद्र सरकार दोन हजार रुपयांचा ८ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ८ वा हप्ता २८ मार्च, २०२१ पासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. हा हफ्ता थेट तुमच्या बँक अकाऊंटला जमा होणार आहे. पंतप्रधान-किसान योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता होळीच्या आधी तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
पूर्वीचा ७ वा हप्ता मागील २५ डिसेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यात ९ कोटी शेतकर्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.यापूर्वी ही योजना केवऴ २ हेक्टर शेती असणाऱ्या शेतकर्यांसाठीच होती. मात्र हीच योजना नंतर देशातील सर्व शेतकर्यांसाठी लागू करण्यात आली. सध्या या योजनेंतर्गत ११.६६ कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत.
नोंदणीत आपले नाव कसे तपासणार ?
जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी नोंदणी केली असेल आणि तुम्हाला तुमची माहिती मिळवायची असेल तर सर्व प्रथम, आपल्याला या योजनेशी संबंधित अधिकृत साइटवर जावे लागेल. ज्यामध्ये शेतकरी कॉर्नरचा पर्याय दिसेल, शेतकरी नोंदणी टॅबवर क्लिक करा.https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर लॉगिन करा, भारताचा नकाशा पेमेंट सक्सेस टॅबच्या खाली दिसेल. भारताचा नकाशा येईल, येथे डॅशबोर्ड लिहिले असेल, त्यावर क्लिक करा, एक नवीन पृष्ठ क्लिक होताच ते उघडेल. त्यानंतर आपण गावाची संपूर्ण माहिती घेऊ शकता.
-
प्रथम राज्य निवडा, नंतर आपला जिल्हा, नंतर तहसील आणि नंतर आपले गाव, शो बटनावर क्लिक करा, त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल.
-
आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक
-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ डिसेंबर २०१९ पासून आधार क्रमांक देखील आवश्यक झाला आहे.
-
यात शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक असणे आवश्यक आहे. तरच शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
दरम्यान घटनात्मक पदावर असणाऱ्या शेतकर्यांना मिऴणार नाही या योजनेचा लाभ. जे शेतकरी राजकारणात घटनात्मक म्हणजेच जिल्हा पंचायत सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार ते आजी-माजी आमदार या पदावर आहेत आशाना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करणा-या अधिकारी कर्मचा-यालाही याचा लाभ मिऴणार नाही.
Share your comments