पीएम किसान (Pm Kisan Yojana) ही केंद्र सरकारची (Central Government) एक महत्त्वाकांक्षी योजना (Farmers Scheme) आहे. या योजनेच्या 11व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर येतं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) 31 मे रोजी सिमला येथून देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करणार आहेत. या योजनेसाठी राज्यातील सुमारे 1 कोटी 5 लाख शेतकरी पात्र आहेत. यामुळे राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे.
दरम्यान, मध्यंतरी या योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ उचलला होता. यामुळे मोदी सरकारने अशा अपात्र लोकांकडून आता वसुली करण्याची मोहीम छेडली आहे. अनेक अपात्र शेतकऱ्यांकडून योजनेचे पैसे वसुल देखील केले गेले आहेत.
तर काही अपात्र शेतकऱ्यांकडून लवकरच या योजनेचा पैसा वसुल केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेत असाल तर पीएम किसान योजनेच्या नवीन यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. ते तपासण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून घरबसल्या तुमच्या गावाची यादी पाहू शकता.
मित्रांनो जसं की आपणांस ठाऊकचं आहे या योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये देते. वार्षिक आधारावर, पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान येतो. या वर्षाचा पहिला हप्ता 31 मे पासून येणे सुरू होईल, असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये पसरत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या सोप्या स्टेप्स, ज्याद्वारे तुम्ही घरी बसून या योजनेची यादी सहज चेक करू शकता.
यादीत असं तपासा आपलं नाव
»सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जावे लागेल.
»येथे पेमेंट सक्सेस टॅबखाली भारताचा नकाशा दिसेल याच्या खाली डॅशबोर्ड लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करा.
»त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल हे व्हिलेज डॅशबोर्डचे पृष्ठ आहे, येथे तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण माहिती मिळवू शकता.
»आधी राज्य निवडा, मग तुमचा जिल्हा, मग तहसील आणि मग तुमचे गाव.
»त्यानंतर शो बटणावर क्लिक करा
»यानंतर, तुम्हाला ज्या बटणाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यावर क्लिक करा, संपूर्ण तपशील तुमच्यासमोर येईल.
»व्हिलेज डॅशबोर्डच्या तळाशी चार बटणे दिसतील, किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला हे जाणून घ्यायचे असेल, तर Data Received वर क्लिक करा, ज्यांचे पैसे बाकी आहेत त्यांनी दुसऱ्या बटणावर क्लिक करा.
Share your comments