भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी (Hon'ble Narendra Modi, the successful Prime Minister of India) यांनी 1 जानेवारी 2022 रोजी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी किसान योजनेचा पैसा वितरित केला. या योजनेसाठी राज्यातील सुमारे 1 कोटी 5 लाख शेतकरी पात्र (Eligible Farmers) असल्याचे सांगितले जात आहे, राज्यातील या पात्र शेतकऱ्यांना देखील पीएम किसान सम्मान निधि योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) दहावा हफ्ता देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत या योजनेचा पैसा मिळू शकलेला नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात आपल्या खात्यावर दहावा हप्ता जमा झाला आहे की नाही याविषयी संभ्रमावस्था (Confusion) कायम आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार अनेक राज्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मान निधीचा पैसा जमा झालेला नाही. रेकॉर्ड मध्ये गोंधळ असल्यामुळे देशातील सर्वात मोठे राज्य (The largest state in the country) म्हणून ओळखले जाणारे उत्तर प्रदेश राज्यात जवळपास 80 टक्के पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजनेचा पैसाच मिळालेला नाही. फक्त उत्तर प्रदेश राज्यातच असा गोंधळ झाला आहे असे नाही इतरही अनेक हिंदी भाषिक प्रदेशात अशीच स्थिती नजरेला पडत आहे, आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जम्मू काश्मीर राज्यात 74 टक्के पात्र शेतकर्यांना पैसा मिळालेला नाही, तर आंध्र प्रदेश राज्यात 76 टक्के पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही, छत्तीसगड आणि तमिळनाडू या राज्यात देखील अनेक पात्र शेतकऱ्यांना या योजनेपासून अद्यापपर्यंत वंचित राहावे लागले आहे.
त्यामुळे राज्यातील देखील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या मनात धाक-धुक कायम बनलेली आहे. त्यामुळे आज आम्ही पीएम किसान सम्मान निधि योजनेचा दहावा हफ्ता (10th Installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) जमा झाला आहे की नाही याची माहिती कशी जाणून घ्यायची, किंवा यादी कशी बघायची याविषयी सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
या पद्धतीने चेक करा यादीत आपले नाव
शेतकरी मित्रांनो जर पीएम किसान सम्मान निधिच्या दहाव्या हफ्त्याच्या यादीत तुम्हाला आपले नाव शोधायचे असेल तर यासाठी आपणास पी एम किसान सन्मान निधी योजनेची pmkisan.gov.in या आधिकारिक वेबसाईटला (To the official website) भेट द्यावी लागेल.
वेब साईटवर गेल्यानंतरवेबसाइटच्या होमपेजवर आपणास Farmers Corner या पर्यायावर क्लिक करावे लागेल, क्लिक केल्यानंतर अजून एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल, या पेजवरती आपणास आपला बँक अकाउंट नंबर अथवा मोबाईल नंबर अथवा आधार कार्ड नंबर या तिघांपैकी एकाची माहिती भरून आपण आपले नाव यादीत आहे की नाही याची खात्री करु शकता.
Share your comments