1. बातम्या

PM किसान AI-चॅटबॉट लॉन्च, शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची जलद, स्पष्ट आणि अचूक उत्तरे मिळणार

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आज एआय चॅटबॉट लाँच केला, जो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा भाग आहे. एआय चॅटबॉटचे उद्घाटन हे पीएम-किसान योजना अधिक प्रभावी बनवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची जलद, स्पष्ट आणि अचूक उत्तरे देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Farmers

Farmers

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आज एआय चॅटबॉट लाँच केला, जो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा भाग आहे. एआय चॅटबॉटचे उद्घाटन हे पीएम-किसान योजना अधिक प्रभावी बनवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची जलद, स्पष्ट आणि अचूक उत्तरे देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

यावेळी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाशी जोडण्याचे हे महत्त्वाचे पाऊल शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासनांतर्गत तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्याचे आवाहन केले असून, आज करण्यात आलेली कृती यामध्ये यशस्वी होईल, असे कृषी राज्यमंत्री म्हणाले. ड्रोनच्या माध्यमातून शेती करण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे, त्यामुळे तरुणाई शेतीकडे आकर्षित होत आहे. यामुळेच देशभरात कृषी क्षेत्रात नवनवीन उद्योग सुरू होत आहेत.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्र्यांनी राज्य अधिकार्‍यांना एआय चॅटबॉट्स वापरण्यासाठी, योग्य देखरेख ठेवण्यासाठी आणि सुरुवातीच्या टप्प्यात उद्भवणार्‍या समस्या त्वरित प्रभावाने सोडवण्याचे प्रशिक्षण देण्यास सांगितले. त्यांनी हा उपक्रम हवामान, पीक नुकसान आणि मातीची स्थिती, बँक पेमेंट इत्यादींशी जोडण्यावर भर दिला.

पीएम-किसान तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये एआय चॅटबॉट सादर करण्याचा उद्देश शेतकऱ्यांना सुलभ आणि सोपा व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. विकासाच्या पहिल्या टप्प्यात AI चॅटबॉट शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती, पेमेंट तपशील, अपात्रतेची स्थिती आणि इतर योजना-संबंधित अद्यतने मिळविण्यात मदत करेल.

English Summary: PM Kisan AI-Chatbot Launched, Farmers will get quick, clear and accurate answers to their queries Published on: 22 September 2023, 11:44 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters