1. बातम्या

पंतप्रधान किसान सन्मान निधी चे लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकले

केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी ही आहे. या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात सहा हजार तीन टप्प्यात म्हणजे दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातात. या योजनेचा हटवा आत्ता या वर्षी मे महिन्यात जारी करण्यात आला होता. परंतु या हप्त्याचे पैसे एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने पैसे पाठवलेत परंतु ते पाठवलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेच नाहीत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
pm kisaan yojna

pm kisaan yojna

 केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी ही आहे. या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात सहा हजार तीन टप्प्यात म्हणजे दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातात. या योजनेचा हटवा आत्ता या वर्षी मे महिन्यात जारी करण्यात आला होता. परंतु या हप्त्याचे  पैसे एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने पैसे पाठवलेत परंतु ते पाठवलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेच नाहीत.

 एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देशातील जवळजवळ 11 कोटी 97 लाख 49 हजार 415 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. आतापर्यंत त्यापैकी दहा कोटी 25 लाख 79 हजार 415 शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी च्या माध्यमातून आठव्या हप्त्याची  रक्कम पाठवण्यात आली आहे. मात्र त्यापैकी चार लाख 45 हजार 287 शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाही. आणि त्यापैकी जवळजवळ सहा लाख 84 हजार 912 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते परंतु अद्याप जमा झालेले नाहीत. वरील आकडेवारी ही 30 जून 2021 पर्यंतचे आहे.

 या योजनेचे सर्वाधिक पैसे हे आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांचे आहेत. आंध्रप्रदेश राज्याचा विचार केला तर त्यातील जवळजवळ तीन लाख 21 हजार 378 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचलेले नाहीत. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 87 हजार 466 उत्तर महाराष्ट्रातील 23 हजार 605 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोचले नाही.

 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत तुमचा रेकॉर्ड कसे चेक  कराल?

  • त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर gov. in या वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे गेल्यावर या योजनेचे होमपेज उघडते.
  • होम पेज वर गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर असा एक ऑप्शन दिसेल.
  • जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधारे व्यवस्थित आपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तेथे मिळेल.

 

  • फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान योजना साठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
  • या पोर्टल वर सरकारने शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिचे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.
  • ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे त्यांची यादी राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि कॅटेगिरी सिलेक्ट  करून पाहू शकता.

 

आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की, या योजनेची घोषणा 24 फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. मात्र पी एम किसान सन्मान योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी 16 लाख पाच हजार 539 शेतकऱ्यांनी दोन हजार रुपयांची रक्कम मिळाली होती.आतापर्यंत या योजनेत 10 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांची नोंद करण्यात आली आहे.

English Summary: pm kisaan yojna (1) Published on: 04 July 2021, 01:24 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters