1. बातम्या

तूर खरेदी केंद्र सुरू होण्याची वेळ आणि व्यापाऱ्यांनी घेतला हा निर्णय

खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून तूर हे पीक ओळखले जाते. जवळ जवळ एका महिन्यापासून तूर बाजारपेठेत दाखल होत आहे. परंतु तुरीला असलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pigeon pie

pigeon pie

खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून तूर हे पीक ओळखले जाते. जवळ जवळ एका महिन्यापासून तूर बाजारपेठेत दाखल होत आहे. परंतु तुरीला असलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदी केली.

आता शासनाच्या निर्णयानुसार एक जानेवारी पासून नाफेड च्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर एकदा ही हमी भावाप्रमाणे  तुरीची खरेदी न केलेले व्यापाऱ्यांनी तुरीच्या दरात वाढ केली आहे. गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला हमी भावापेक्षा जास्तीचा दर मिळाला.

 जर आतापर्यंत तुरीच्या भावाचा विचार केला तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तुरीला पाच हजार आठशे रुपये भाव मिळत होता. परंतु गेल्या दोन दिवसापासून तुरीच्या दरात अचानक वाढ होत आहे.

गुरुवारी पांढरा तुरीला सहा हजार 330 रुपयाचा भाव मिळाला होता.त्यामुळे आता खरेदी केंद्र सुरू होण्याची वेळ आणि आताअचानक भावाचे बदललेले चित्र यामुळे शेतकरी चक्रावून केले आहेत.

 एक जानेवारीपासून नाफेडच्या वतीने होणार 186 तूर खरेदी केंद्र सुरू..

 केंद्र सरकारने तुरीला सहा हजार तीनशे रुपये हमीभाव ठरवलेला आहे. परंतु अद्याप पर्यंत तूरीचे खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना व्यापारी शिवाय पर्याय नव्हता त्यामुळे व्यापाऱ्यांनी कमी दरात तूर खरेदी केली होती. 

परंतु आता एक जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून राज्यात 186 तुर खरेदी केंद्र सुरु होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता हमीभावा प्रमाणे तरी म्हणजे सहा हजार तीनशे रुपये दर मिळणार आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया खरेदी केंद्रांवर सुरू करण्यात आली असून त्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, 8 अ उतारा,आधार कार्ड आणि पिक पेरा याची नोंद घेऊन नोंदणी करावी लागत आहे.हेखरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

English Summary: pigeon pie rate is growth due to guarante rate center start from one january Published on: 31 December 2021, 09:20 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters