यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव प्राप्त होत होता. सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव प्राप्त होता, मात्र मध्यंतरी सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण नमूद करण्यात आली होती, केंद्र सरकारने सोया पेंड आयातीला मंजुरी दिल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याचे स्पष्ट झाले होते. सोयाबीनच्या बाजारभावात घसरण झाल्यानंतर आत्ता तुरीच्या बाजार भाव आज देखील घसरण होत असल्याचे चित्र वाशीम जिल्ह्यात समोर येत आहे.
त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये एका आठवड्यातच तुरीच्या बाजारभावात पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढी प्रचंड घसरण झाली आहे. जिल्ह्यात तुरीचे लक्षणीय क्षेत्र नजरेस पडते, मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे तुर पिकाला मोठा फटका बसला परिणामी तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे सांगितले जात आहे. उत्पादनात घट तर होतीच, शिवाय शासनाने तुर पिकाला अवघा 6 हजार 300 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केल्याने सुरुवातीपासूनच तुर पिकाला अपेक्षित बाजार भाव प्राप्त होत नव्हता. हंगामाच्या सुरुवातीला तुरीच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले होते.
नंतर मात्र तुरीच्या बाजार भावात थोडीशी वाढ झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांनी मोकळा श्वास सोडला होता. मागच्या आठवड्यात तुर पिकाला चांगला बाजारभाव प्राप्त झाला होता, तूर पीक आणि जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला होता. मागच्या सोमवारी कारंजा बाजारपेठेत तुरीला 6800 प्रति क्विंटल असा बाजारभाव प्राप्त झाला. त्यामुळे परिसरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता. मात्र असे असले तरी, तूर उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा जास्त काळ टिकू शकला नाही आणि आता परत तूर बाजार भावात कमालीची घसरण नोंदविण्यात आली आहे. या मंगळवारी कारंजा बाजारपेठेत तुरीच्या बाजार भावात सहाशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे घसरण नोंदविण्यात आली सध्या बाजारपेठेत तुरीला 6200 प्रति क्विंटल असा दर प्राप्त होत आहे.
शेतकरी मित्रांनो आतापर्यंत तुरीच्या बाजार भावात चांगली तेजी बघण्यास मिळत होती, त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी देखील शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्याला प्राधान्य दिले नाही, त्याऐवजी तूर उत्पादक शेतकऱ्यांनी खाजगीत तुर विक्री करण्याचा निर्धार केला होता. मात्र आता तुरीच्या बाजार भावात कमालीची घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्री करावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोक येताना दिसत आहेत.
Share your comments