राज्यात सध्या राजकीय वातावरण वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. मी मुख्यमंत्रीपद सोडत असून आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नाही. यामुळे चर्चा सुरु झाली आहे, त्यांनी आमदारकी सुद्धा सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
असे असताना मात्र त्यांनी फक्त मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, आमदारकी न सोडण्याचे कारण म्हणजे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहावे, या हेतूनेच अद्यापही त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे समजते. विशेष म्हणजे विधानपरिषद आमदारांचा राजीनामा सभापतींकडे दिला जातो. मात्र, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ 7 जुलै रोजीच संपुष्टात आला आहे. यामुळे चर्चा सुरु आहे.
उपसभापतीपदी सध्या शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे या आहेत. याबाबत संख्याबळ बघितले तर शिवसेनेकडे एकूण 12 विधानपरिषद सदस्य आहेत. त्यामुळे, जोपर्यंत येथील 8 आमदार बंड करत नाहीत, तोपर्यंत येथे संवैधानिकदृष्ट्या वेगळ्या गटाला मान्यता मिळणार नाही. सध्या ८ आमदार शिंदे गटात जातील असे वाटत नाही.
दरम्यान, विधानपरिषदेत शिवसेनेचे 12 सदस्य असून काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी 10 सदस्य आहेत. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला देण्यात आलं आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना आणि काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. यामुळे आता पुढे अनेक राजकीय गोष्टी घडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
खत म्हणून कोळसा आणि वाळू, बोगस कंपन्यांचा राज्यात धुमाकूळ...
'तारीख लक्षात ठेवा 30 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार'
'बांधावरुनच समजतात शेतकऱ्यांच्या समस्या, राजकारणाची वेळ नाही अन्यथा दरेकरांना...'
Share your comments