1. बातम्या

सोयाबीनच्या फुले संगम वाणाचे प्रतिहेक्ट री 35.72 क्विंटल उत्पादन

यावर्षीच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा तालुक्यातील सेनगाव येथील प्रगतिशील शेतकरी राहुल दत्तराव कव्हर यांनी गादीवाफ्यावर टोकन पद्धतीने सोयाबीन ची लागवड करून सोयाबीनचे फुले संगम के डी एस 726 या वाणाचे विक्रमी म्हणजे प्रतिहेक्टेरी 35.72 क्विंटल म्हणजे एकरी 14.28क्विंटल एवढे उत्पादन मिळवले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soyabioen crop

soyabioen crop

यावर्षीच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा तालुक्यातील सेनगाव येथील प्रगतिशील शेतकरी राहुल दत्तराव कव्हर यांनी गादीवाफ्यावर टोकन पद्धतीने सोयाबीन ची लागवड करून सोयाबीनचे फुले संगम के डी एस 726 या वाणाचे विक्रमी म्हणजे प्रतिहेक्‍टरी 35.72 क्विंटल म्हणजे एकरी 14.28क्विंटल  एवढे उत्पादन मिळवले आहे.

 फुले संगम वाण राहुरी विद्यापीठ कडून विकसित

 या संदर्भात तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्र आणि बायफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत समूह पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम यामध्ये ताकतोडा तालुका सेनगाव या गावाची निवड करण्यात आली होती. या गावाचे सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता सरासरी 14 क्विंटल होती. उत्पादकता वाढीसाठी या गावातील 25 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती.त्यांना राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीनचे नवीन वाण के डी एस 726 फुले संगम प्रत्येकी 30 किलो बियाणे प्रात्यक्षिक करिता देण्यात आले.

मशागत

 कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करून राहुल दत्तराव कव्हर यांनी यंदाच्या एप्रिल महिन्यात खोल नांगरणी करून वखराच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केली

सोयाबीन बीज प्रक्रिया

 विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सोयाबीन बियाण्याची ट्रायकोडर्मा, रायझोबियम व पीएसबी ची बीजप्रक्रिया केली व माती परीक्षणावर आधारित  शिफारशीनुसार खतांच्या मात्रा दिल्या व गादीवाफ्यावर टोकन पद्धतीचा अवलंब केला.

 या वाणाची लागवड

 लागवड करताना  बेडचा टॉप हा 60 सेंटिमीटर ठेवला व त्यावर 60 बाय 15 सेंटिमीटर अंतरावर झीग पद्धतीने 16 जून रोजी सोयाबीन बियाण्याची टोकण पद्धतीने लागवड केली व त्याकरिता त्यांना 28 गुंठे साठी 14 किलो बियाणे लागले.एकरी झाडांची संख्या 81 हजार 666इतकी ठेवली.तर नियंत्रण मशागती या पद्धतीने करून सुरुवातीपासून रोग आणि किडीवरप्रभावी नियंत्रण केले. त्याकरिता निंबोळी अर्क तसेच शिफारशीत कीडनाशकांचा  केंद्राच्या मार्गदर्शनात त्यांनी वापर केला.

 नऊ हजार प्रतिक्विंटल दराने बियाणे विक्री

 कव्हर यांना 28 गुंठे क्षेत्रावर दहा क्विंटल म्हणजे 40 गुंठे प्रति एकर क्षेत्रावर 14.8 28 क्विंटल उत्पादन मिळाले. या उत्पादनांमध्ये त्यांनी साडेचार क्विंटल बियाण्याची नऊ हजार रुपये दराने विक्री केली.समूह पंक्ती प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी अन्य शेतकऱ्यांनी सुद्धा उत्साहवर्धक उत्पादन घेतले.जिल्ह्याची सोयाबीन उत्पादकता 9.86 क्विंटल असताना सरासरी 25.20क्विंटल अधिक उत्पादकता मिळाली. उत्पादन खर्चामध्ये 25 टक्के बचत करून एकूण 38.78टक्के जास्त उत्पादन घेण्यात आले.

(संदर्भ- हॅलो कृषी)

English Summary: phule sangam veriety of soyabioen get more production of soyabioen Published on: 16 December 2021, 11:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters