केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन घोषणा केली आहे. गडकरी यांनी आता 100 रुपये लिटरच्या आसपास विकले जाणारे पेट्रोल 15 रुपये लिटरने मिळू शकते, असे विधान केले आहे. तसेच सरकारचे एक उद्दिष्ट पूर्ण झाले तर हे स्वप्नही पूर्ण होऊ शकते.
60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास पेट्रोलचे दर 15 रुपयांपर्यंत खाली येतील, असा दावा गडकरी यांनी केला आहे. 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास पेट्रोलची किंमत 15 रुपये प्रति लीटर होईल.
सध्या देशातील शेतकऱ्यांना अन्नदाता म्हटले जाते, मात्र आमचे सरकार त्यांना ऊर्जा देणारे बनविण्याच्या योजनेवर काम करत आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या ऊस आणि इतर पिकांपासून इथेनॉल तयार केले जात आहे.
काळ्या टोमॅटोच्या शेतीतून मिळवा लाखोंचे उत्पन्न! जाणून घ्या लागवड, खर्च आणि उत्पन्न…
सध्या आपण सुमारे 16 लाख कोटी रुपये आयातीवर खर्च करत आहोत. हा पैसा वाचेल आणि शेतकऱ्यांच्या घरी जाईल असे गडकरी म्हणाले आहेत. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. आम्ही हळूहळू त्यात वाढ करू.
बांबूचे लाकूड का जाळत नाहीत? जाणून घ्या काय आहे सत्य..
ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल आणि त्यांची मागणीही वाढेल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. आता हे प्रत्यक्षात कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार पुन्हा अडचणीत, जरंडेश्वर कारखान्याबाबत मोठी बातमी आली समोर..
हार्वेस्टर मशीनवर ५०% सबसिडी मिळणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
भारतातील सर्वात महागडी म्हैस, किंमत 9 कोटी आणि वजन 1500 किलो
Share your comments