देशात एकीकडे महागाई आकाशाला गवसणी घालत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel Price) बाबतीत देशातील जनतेस थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण की गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Shortage) घट झाली आहे. असे असले तरी एकदा दर कमी झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर आता स्थिर असल्याचे बघायला मिळतं आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी देशभरातील इंधन पंपावर पेट्रोल व डिझेलची टंचाई जाणवू शकते. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या टंचाईमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता देखील यावेळी वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात पेट्रोलने कधीच शंभरी पार केली आहे.
डिझेल देखील राज्यात शंभरीच्या जवळ तर काही ठिकाणी शंभरी पार विकले जात आहे. मालेगावात पेट्रोल 111 रुपये प्लस विक्री केले जातं आहे. तर डिझेल देखील 100 रुपये प्लस विकले जातं आहे.
यामुळे 31 तारखेला जर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवली तर निश्चितचं पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत भडका उडणार आहे. यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेस मोठा धक्का बसणार आहे. मध्यमवर्गीय लोकांचे यामुळे बजेट कोलमडणार असल्याची भिती आता व्यक्त केली जातं आहे.
Royal Enfield Bullet: 23 हजारात खरेदी करा 'ही' रॉयल एनफिल्डची भन्नाट बाईक; जाणुन घ्या ही ऑफर
31 मे रोजी पेट्रोल-डिझेल टंचाईचे संकट येऊ शकते
देशाच्या राजधानीसह 14 राज्यांतील पेट्रोल पंप डीलर्सनी 31 मे 2022 पासून सरकारी तेल कंपन्यांच्या तेल डेपोतून पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
2017 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नसल्याचे पंप मालकांचे म्हणणे आहे. पंपमालकांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारवर दबाव आणण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे मात्र सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसणार आहे.
आधीच पेट्रोल-डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत असताना सध्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या पेट्रोल-डिझेलची टंचाई निश्चितचं सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होणार आहे. यामुळे दरवाढ देखील होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.
Share your comments