1. बातम्या

बटाटे पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

बटाटे पीक वर्षभर घेतले जाते. महाराष्ट्रात सातारा , पुणे , अहमदनगर , नाशिक आणि औरंगाबाद येथे बटाटयाची लागवड मोठ्या संख्येने करण्यात येते. बटाटे पीक खरीप आणि रब्बी हंगामात घेतले जाते. बटाट्यामध्ये क आणि ब जीवनसत्वे असतात. यापिकांवर किडी आणि रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यात मुख्य आणि जास्त प्रमाणात होणाऱ्या किडी म्हणजे मावा , फुलकिडे , कोळी , तुडतुडे , पाकोळी आणि हुमणी हे आहेत.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Potato Crop

Potato Crop

बटाटे पीक वर्षभर घेतले जाते. महाराष्ट्रात सातारा , पुणे , अहमदनगर , नाशिक आणि औरंगाबाद येथे बटाटयाची लागवड मोठ्या संख्येने करण्यात येते. बटाटे पीक खरीप आणि रब्बी हंगामात घेतले जाते. बटाट्यामध्ये क आणि ब जीवनसत्वे असतात. यापिकांवर किडी आणि रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यात मुख्य आणि जास्त प्रमाणात होणाऱ्या किडी म्हणजे मावा , फुलकिडे , कोळी , तुडतुडे , पाकोळी आणि हुमणी हे आहेत.

रोग व कीड -
करपा -
पानवर काळे ठिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेनएम ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मर -
मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात. बुंध्याजवळ जमिनीलगतच्याभागावर बुरशीची वाढ झालेली दिसते.
या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची फरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो. जमिनीत नँप्थलीन किंवा फॉरमँलिन(१:५०) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.

खोक्या रोग -
या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षाअधिक असल्यास ते जंतूंना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नासतात. या किडीच्या नियंत्रणासाठी जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस च्या वर चढण्यापूर्वी बटाट्याचीकाढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.

कीड-
देठ कुडतरणारी अळी –
राखी रंगाची अळी असून रात्रीचे वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात. या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५ % पावडर हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी.

मावा व तुडतुडे -
या किडीत पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर १५ दिवसांनी मिथिल डिमेटाँन १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून किंवा फाँस्फोमिडाँन ८५ डब्लू एमसी १० मिलि १० लिटर पाण्यात फावरावे.

बटाट्यावरील पंतग -                                                                                                                                                     हि किड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या किडीची सुरवात शेतातूनहोते. परंतुनुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या आळया पानात देठात व खोडात शिरून पोखरतात. आळया बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात. या किडीच्या नियंत्रणासाठी कार्बारील ५० डब्लू.पी. १.५ किलो ७५० पाण्यात मिसळून फावरावे.

English Summary: Pest and disease management of potato crop Published on: 09 November 2023, 06:14 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters